1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

भूतनाथ : बंकूचा प्रिय मित्र

भूतनाथ : बंकूचा प्रिय मित्र
IFM
निर्माता : रवी चोप्र
दिग्दर्शक : विवेक शर्मा
गीतकार : जावेद अख्तर
संगीतकार : विशाल-शेखर, सलीम-सुलेमान
कलाकार : अमिताभ बच्चन, अमन सिद्दीकी, जूही चावला, प्रियांशु चटर्जी, सतीश शाह, राजपाल यादव, शाहरुख खान (विशेष भूमिकेत)

तसं पाहिलं तर त्याचं नाव अमन शर्मा आहे. पण त्याला प्रेमाने सर्व जण बंकू (अमन सिद्दीकी) म्हणून हाक मारतात. सात वर्षाच्या या बंकूला दंगामस्ती करायला फार आवडते. तो रोज नवनवीन कथा रचण्यात माहिर आहे. आणि आईला (जूही चावला) त्रास देणे हा त्याचा आवडता छंद आहे.

बंकूचा एक 'काल्पनिक' मित्र भूतनाथ (अमिताभ बच्चन) आहे. भूतनाथ फारच कमी बोलणारा आणि प्रत्येक गोष्टीत तणतण करणारा आहे. पण बंकूच्या मैत्रीमुळे तो पूर्णपणे बदलून जातो. भूतनाथला बंकूमध्ये आपला नातू दिसतो.

बंकू आणि भूतनाथ मिळून शाळेत व घरात फार दंगामस्ती करतात. भोळा भाबड्या बंकू आणि भूतनाथमध्ये एक भावनात्मक बंध जुळतो.हे जग मुलांच्या डोळ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात केला आहे.

IFM
अमिताभला जेव्हा या चित्रपटाचा प्रस्ताव मिळाला होता, तेव्हा त्यांना दिग्दर्शक विवेक शर्मावर भरवसा नव्हता. त्याने चित्रपटाचे निर्माते रवी चोप्रा यांच्यासमोर एक अट ठेवली होती. शूटिंग असेल त्यावेळी त्यांना सेटवर हजर व्हावे लागेल.

चित्रपटाची शूटिंग पुढे सरकत गेले तसा अमिताभचा विवेकवरील विश्वास वाढत गेला आणि त्यांनी रवी चोप्रांना आपल्या अटीतून मुक्त केले. या चित्रपटात शाहरुख खानही थोड्या वेळासाठी दिसून येतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा