मल्लिका आता लोकांना ''डसणार''
|
नागकन्या, इच्छाधारी नागिण या विषयावर अनेक चित्रपट बॉलीवूडमध्ये बनले आहेत. हा चित्रपटही त्याच मिथकावर आधारीत आहे. यात मल्लिका नागिण असून ती तिला वाटले तेव्हा सुंदर मुलीचे रूप घेऊ शकते. तिला तिच्या प्रियकराचा शोध घ्यायचा आहे. यात अनेक रंजक घटना आहेत. गुपिते आणि थरारक वळणांच्या मार्गावरून ही नागिण अखेर तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचते अशी ही ढोबळमानाने कथा आहे.
चित्रपटाची निर्मिती विक्रमसिंह व गोविंद मेनन करत आहेत. दिग्दर्शन हॉलीवूडची जेनिफर लिंच करते आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड लिंच यांची ती कन्या आहे.
