रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

मिर्च

मिर्च श्रेयस तळपदे
IFM
बॅनर : रिलायंस बिग पिक्चर्स
दिग्दर्शक : विनय शुक्ला
संगीत : मोंटी शर्मा
कलाकार : श्रेयस तळपदे, कोंकणा सेन शर्मा, शहाना गोस्वामी, रायमा सेन, राजपाल यादव, बोमन ईरानी, प्रेम चोप्रा, सौरभ शुक्ला, टिस्का चोप्रा, इला अरुण, अरुणोदय सिंह

मानव एक स्क्रिप्ट रायटर असून चित्रपट जगात आपली जागा बनविण्यासाठी संघर्ष करीत आहे. तो आपल्या लिहिलेल्या स्क्रिप्टमध्ये काहीच फेरबदल करायला तयार नसतो, म्हणून एकही निर्माता त्याच्याबरोबर काम करायला तयार होत नाही.

त्याची गर्लफ्रेंड रुची एक सफल फिल्म संपादक असते आणि ती मानवची भेट नीतिन नावाच्या चित्रपट निर्मात्याशी करवते. नीतिनला मानवने लिहिलेली स्क्रिप्ट पसंत पडते, पण त्याचे असे मत असते या कथेच्या आधारावर एक कमर्शियल चित्रपट तयार होणे शक्य नाही आहे.

मानव त्याला पंचतंत्रावर आधारित कथा सांगतो, ज्यात एक पती आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराबरोबर पकडतो. पण ती महिला मोठ्या चतुराइने आपला बचाव करून घेते.

ही कथा नीतिनला पसंत येते, पण त्याचे म्हणणे आहे की ही कथा चित्रपट तयार करण्यासाठी पुरेशी नाही आहे. मानव याच प्रकारच्या तीन कथा त्याला सांगतो. या प्रकारे पंचतंत्रच्या चारी कथा आपसांतच गुंतल्या जातात.

या सर्व कथेचे संदेश एकच असते म्हणजे जर तुमच्यात बुद्धी, समज असेल तर तुम्ही कितीही कठीण परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढण्यात सक्षम असता. संबंधांत स्त्री-पुरुषांच्या बरोबरीची गोष्ट मिर्च चित्रपटात मांडण्यात आली आहे.