मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

'राईट या रॉंग'

राईट या रॉंग आगामी चित्रपट सनी देओल ईशा कोप्पिकर
IFM
निर्माता : नीरज पाठक, कृष्णन चौधरी
दिग्दर्शक : नीरज पाठक
संगीत : मोंटी शर्मा
कलाकार : सनी देओल, ईशा कोप्पिकर, इरफान खान, कोंकणा सेन शर्मा, किरण खेर, दीपल शॉ, गोविंद नामदे

'राईट या रॉंग' ही दोन पोलिस अधिकार्‍यांच्या स्पर्धेची कथा आहे. अजय सिंह (सनी देओल) आणि एसीपी राणे (इरफान खान) हे ते दोन अधिकारी. अजयच्या पत्नीची (इशा कोप्पिकर) हत्या होते. संशयाची सुई अजयकडे दाखवली जाते. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी राणेकडे सोपविल्याने अजय आणखी अडचणीत सापडतो.

IFM
विद्या (कोंकणा सेन शर्मा) राणेची लहान बहिण आहे. अडचणीत सापडलेल्या अजयला मदत करण्यसाठी ती पुढे येते. या प्रकरणाच्या तपासात अनेक आश्चर्यकारक बाबी समोर येत जातात नि अजय व राणे यांच्यातील तणाव आणखी तीव्र होत जातो. दोघेही परस्परांशी बुद्धिकौशल्याने लढत आहेत. त्यामुळे ही लढक अधिकाधिक रंजक होत जाते. यात राईट काय नि रॉंग काय हे प्रेक्षकांना ठरवायचे आहे.