रामगोपाल वर्मा की आग
|
निर्माता : रामगोपाल वर्मा
दिग्दर्शक : रामगोपाल वर्मा
कलाकार : अमिताभ बच्चन, मोहनलाल, अजय देवगन, सुष्मिता सेन, निशा कोठारी, प्रशांत राज
मुंबईतील रेल्वे स्टेशनवर ट्रेन धडधडत येऊन थांबते. दोन तरूण प्लॅटफॉर्मवर पाय ठेवतात. आजपर्यंत डोळ्यात साठवलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ते पहिल्यांदाच स्वप्ननगरी मुंबापुरीत पाय ठेवत असतात. दोघांचेही ध्येय निश्चित आहे. त्यांच्यातील मैत्री व परस्परांवरील विश्वास इतरांसाठी आदर्शवत आहेत. हिरेंद्र चव्हाण ( अजय देवगण ) व राज रानडे ( प्रशांत राज ) परस्परांच्या संगतीतच लहानाचे मोठे झाले आहेत.
दोघेही सुख-दु:ख, यशापयशांना धीरोदात्तपणे सामोरे गेले
|
पोलिस अधिकारी शामभूलच्या काळ्या धंदयाविषयी माहिती देवून त्यांना सतर्क करतो. नरसिह त्यांना शामभूलला अटक करण्यासाठी मदतीचे आवाहन करतो. दोघेही साहस, व शौर्य दाखवत शामभूलला पकडून देतात मात्र यादरम्यान पोलिस खटल्यात फसल्याने त्यांना तुरूंगात जावे लागते. चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच बब्बन (अमिताभ बच्चन) अवतरतो. तो एक खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्यापर्यंत कोणीही पोहचू शकत नाही.
|
