मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|
Last Modified: बुधवार, 19 मे 2010 (11:44 IST)

रावण

कलाकार अभिषेक बच्चन
बॅनर : मद्रास टॉकीज, रि‍लायंस बिग पिक्चर्स
निर्माता-दिग्दर्शक : मणिरत्न
गीत : गुलजा
संगीत : ए.आर. रहमा
कलाकार : अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, विक्रम, गोविंदा, निखिल द्विवेदी, मनीषा कोइराला, रवि किश
रिलीज डेट : 18 जून 2010
PR
PR


रावण या चित्रपटासाठी मणिरत्म यांनी जेवढी मेहनत केली आहे, तेवढीच त्यांनी आपल्या कलावंतांकडूनही करवून घेतली आहे. या चित्रपटाचे शुटींग अतिशय दुर्गम ठिकाणी झाले आहे. तिथे शुटींगचे सर्व सामान घेऊन पोहोचणेही शक्य नव्हते. कोणत्याही सुविधा उपलब्ध नसतानाही कोणीही त्याबद्दल चकार शब्द काढला नाही. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय असे स्टार कलावंत असूनही सामान्य कलावंतांसारखेच ते राहिले.

PR
PR
रावणच्या कथेत तीन मुख्य भूमिका आहेत. बीरा मुंडा (अभिषेक बच्चन), देव प्रताप शर्मा (विक्रम) आणि रागिणी (ऐश्वर्या राय) बीरा कोणत्याही कायद्याला मानत नाही. तो म्हणेल तोच कायदा. देव मात्र कायद्याचा रक्षक आहे.

रागिणी शास्त्रीय नृत्यांगना आहे. देव आणि तिचे मनोमीलन होऊन ते लग्न करतात. उत्तर भारतातील एका छोट्या शहरात देवची बदली होते. दोघेही तेथे जातात.

लाल माटी नावाच्या या शहरात बीराचा अंमल आहे. बीरा आदिवासी असून या भागात त्याचेच नाव असते. देवला याची कल्पना आहे. शिवाय शहरात कायदा-सुव्यवस्था आणण्यासाठी त्याला बीराला मात द्यायची आहे.

PR
PR
बीराच्या साम्राज्याला देव तडाखा देतो. त्याच्या पकडीतून तो जेमतेम निसटतो. त्यानंतर देवला अद्दल घडवायची हाच हेतू त्याच्यापाशी असतो. बीरा परत येतो आणि देव-रागिणी यांच्यासोबत जंगलात त्यांच्याशी कावेबाजपणे युद्ध खेळतो.

निबिड अशा जंगलात हे युद्ध चालले आहे. पण या युद्धात सत्य काय आहे, तेही हळूहळू उलगडत जाते. सत् विरूद्ध असतची ही लढाई प्रत्यक्षात सत्य काय आहे हे कळू लागल्यानंतर गोंधळात टाकायला लागते. नेमकी भली बाजू कोणाची हेच कळेनासे होते.