शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

रेडियो

हिमेश रेशमिया
IFM
IFM
निर्माता : रवि अग्रवाल
दिग्दर्शक : ईशान त्रिवेदी
संगीतकार : हिमेश रेशमिया
कलाकार : हिमेश रेशमिया, शहनाज़ ट्रेज़रीवाला, सोनल सहगल, ज़ाकिर हुसैन, राजेश खट्टर

विवान (हिमेश रेशमिया) यशस्वी आर जे आहे. मुंबईच्या एका रेडियो चॅनेलवर तो काम करतो आहे. त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी सर्व काही आहे. पूजासोबत (सोनल सहगल) त्याच घटस्फोट झाला आहे.

IFM
IFM
पूजा आणि त्याच्या वैचारिक मतभेद नाहीत. पण वेगवान जीवनशैलीमुळे विवान पूजाला वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यात घटस्फोट होतो. विवानच्या या रिकाम्या आयुष्यात शनाया (शेनाज ट्रेजरीवाला) हिचा प्रवेश होतो. शनायाच्या बाबतीत तो पूजालाही सांगतो. तिलाही विवानच्या डोळ्यात शनायाप्रती प्रेम दिसते आणि ती दोघांना जवळ आणण्याच्या प्रयत्नाला लागते.

पण विवानच्या मनात पूजाविषयीही प्रेम आहे. पण शनायालाही त्याला आवडत असते. या संभ्रमात्मक स्थितीत तो काय निर्णय घेतो यासाठी 'रेडियो' पहायला पाहिजे.