बॅनर : ब्लॉकबस्टर मूवीज़ एंटरटेनर्स निर्माता : आशिन शाह दिग्दर्शक : विपुल शाह गीत : प्रसून जोशी संगीत : शंकर-अहसान-लॉय कलाकार : सलमान खान, अजय देवगन, असिन, ओम पुरी, रणविजय सिंह, आदित्य रॉय कपूर, खालिद आज़मी
मन्नू (सलमान खान) आणि अर्जुन (अजय देवगण) बालपणापासूनचे मित्र आहेत. दोघांचा स्वभाव मित्र भिन्न आहे. पण संगीताविषयी दोघांनाही प्रेम आहे. मन्नू आयुष्य चवीने जगणारा माणूस आहे. मुलींच्या मागे लागणे त्याला आवडते. पण तो तितकाच चांगला गायकही आहे. अर्जुनवर त्याचा खूप विश्वास आहे.
अर्जुन मात्र महत्त्वाकांक्षी आहे. तो संतापीही आहे. म्हणूनच देवावरही त्याचा फारसा विश्वास नाही. संगीत जगतात नाव कमावणे हे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी आहे.
IFM
IFM
अर्जुनच्या घरी त्याच्या काकांशिवाय कोणीही नाही. त्यांना सोडून तो लंडनला आपले स्वप्न साकार करण्यासाठी निघून जातो. तिथे तो स्वतःची ओळख तयार करायला लागतो. तेथे जोहेब आणि वासीम या दोन पाकिस्तानी तरूणांच्या मदतीने तो आपला बॅंड तयार करतो. प्रिया (असीन) ही दक्षिण भारतीय मुलगीही त्याच्या बॅंडमध्ये सामील होते. अर्जुन मनातून तिच्यावर प्रेमही करू लागतो.
इकडे भारतात पंजाबात असलेला मन्नू कर्जाच्या बोज्याखाली अडकतो. कमाईसाठी तो गावच्या बॅंड पार्टीत सामील होते. एका दिवशी अर्जुन व मन्नूची भेट होते आणि अर्जुन त्याला लंडनला घेऊन जातो. पण नंतर त्याला कळते की मन्नूला लंडनला आणून त्याने मोठी चूक केली आहे.
मन्नू त्याच्यापेक्षा जास्त प्रतिभावंत आहे. त्यामुळे त्याला मोठे यश मिळते. जे यश मिळवायला अर्जुनला बरेच दिवस लागले, ते मन्नूला सहजगत्या मिळते. त्यातच प्रियाही मन्नूकडे आकर्षित होते. त्यामुळे तर अर्जुनची चीडचीड आणखी वाढते. त्यातच मन्नूला संपविण्याची योजना अर्जुन आखतो. अर्जुनचे हे इरादे यशस्वी होतात काय? हे पाहण्यासाठी लंडन ड्रिम्स पहावा लागेल.