'लक बाय चान्स' या चित्रपटाशी अख्तर फॅमिली जोडली गेली आहे. जावेद अख्तर यांची मुलगी जोयाने या चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यास कोणताही कलाकार तयार नव्हता तेव्हा जोयाने आपला भाऊ फरहानला प्रमूख भूमिकेत घेतले आहे. जावेद अख्तर यांची गीते आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा हिंदी फिल्म इंडस्ट्रीवर आधारीत आहे. कलाकारांचा संघर्ष, त्यांना मिळणारे यश आणि येथील राजकारणावर चित्रपटातून भाष्य करण्यात आले.
IFM
इंडस्ट्रीमध्ये आपले नशिब शोधण्यासाठी आलेल्या सोनाची (कोंकणा सेन शर्मा) आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे. एका अपार्टमेंटमध्ये प्लॅट भाड्याने घेऊन ती रहात असते. बॉलीवूडमध्ये करियर करण्यासाठी मित्रांबरोबर तिचा वेळ जात असतो.
श्रीमंत घरातील विक्रम (फरहान अख्तर) आपले आरामदायक जीवन सोडून चित्रपटात नशिब आजमावण्यासाठी मुंबईत येतो. सोना आणि विक्रमची भेट होते आणि ते एकमेकांच्या जवळ येऊ लागतात.
IFM
रॉली (ऋषि कपूर) हे बॉलीवूडमधील यशस्वी निर्मात आहेत. पण, ते केवळ स्टार कलाकारांनाच संधी देतात. सुपरस्टार नीना (डिम्पल कापडि़या) यांची मुलगी निक्की खुराना (ईशा श्रावणी) ला घेऊन ते एक चित्रपट करत असतात. रॉलीचा आवडता स्टार जफर खान(ऋतिक रोशन) नायकाच्या भूमिकेत आहे.
एकदिवस विक्रम रॉलीच्या सेटवर येतो आणि त्याचे नशिबच बदलून जाते. तो ऑडिशन देतो आणि या संधीचा फायदा करून घेतो. या चित्रपटातून बॉलीवूडमधील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्याकडे कला असणा-याबरोबर नशिबाची साथ असेल तरच याठिकाणी करियर होऊ शकते, असे दाखविण्यात आले आहे.