सोमवार, 2 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

लव स्टोरी 2050

लव स्टोरी 2050
IFM
निर्माताः पम्मी बावेजा
निर्देशकः हॅरी बावेजा
संगीतः अनू मलिक
गीतः जावेद अख्तर
कलाकारः हरमन बावेजा, प्रियंका चोपडा, बोमन इराणी, अर्चना पूरणसिं

बॉलिवूडमध्ये नव्या नायक आणि नाईकांची एंट्री नेहमीच सुरू असते. निर्माता-दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा हरमन बावेजाही हिरोच्या रूपात 'लव स्टोरी 2050' या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करीत आहे.

हरमनची सुरुवात शानदार व्हावी यासाठी हॅरीने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. 'टाइम मशीन' या संकल्पनेवर आधारित असलेल्या हा चित्रपट आपल्याला 2050 च्या दुनियेत घेऊन जातो. हा फिल यावा यासाठी त्यांनी स्पेशल इफेक्ट्सचा भरपूर वापर केला आहे.

चित्रपटाची कथा थोडक्यात अशी-

IFM
उत्साही आणि खिलाडू वृत्तीच्या करणला (हरमन बावेजा) कायदे कानून या भानगडीत जीवन जगणे आवडत नाही. तर काहीशी लाजाळू वृत्तीची सना (प्रियंका चोपड़ा) हिचा शिस्तबद्ध जीवन जगण्याकडे कल असतो. दोघांच्या विचारशैलीत मोठा विरोधाभास असला तरीही दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.

डॉ. यतिंद्र खन्ना (बोमन इराणी) हे करणचे काका आहेत. अनेक वर्षांपासून 'टाइम मशीन'च्या निर्मितीसाठी त्यांचे संशेधन सुरू असून ते त्यात यशस्वी होतात. सनाला जेव्हा हे कळते तेव्हा ती टाइम मशीन साहाय्याने भविष्यातील मुंबई पाहण्याची इच्छा व्यक्त करते.

करण, सना, डॉ. यतिंद्र आणि सनाचा लहान भाउ व बहीण राहुल आणि ठिय्या 2050 च्या मुंबईत पोहचतात. तेथे उडणा-या गाड्या आणि रेल्वे, 200 मजली इमारती, काम करणारे रोबोट हे सार पाहून ते थक्क होतात. त्यानंतर असे काही घटनाक्रम घडत जातात की करणला आपण सनापासून वेगळे होत असल्याची जाणीव होते. त्यावेळी क्यूटी (रोबोट) आणि बू (रोबोटिक टेडी बिअर) हे दोघांना पुन्हा जवळ आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

IFM
दरम्यानच्या काळात त्याला भविष्यातील देवता असलेल्या डॉ. होशीकडून धमकाविले जाते. त्यानंतर करण हे सर्व कसे हाताळतो, त्याला त्याचे प्रेम परत मिळते का? आणि पुन्हा परत येतो का? आदी अनेक प्रश्न पडद्यावरच पाहिलेले बरे...

हा लेख आपणास कसा वाटला, आम्‍हाला जरूर कळवा..