लव्ह आज लंडन, सन फ्रान्सिस्को, दिल्ली - 2009 लंडनमध्ये रहाणारा जय आणि मीरा परस्परांवर अनुरक्त आहेत. पण लग्न परंपरेवर त्यांचा विश्वास नाही. जीवन जिकडे वाहिल तिकडे आनंदाने जाणे हे त्यांनी ठरवून टाकले आहे. हिर- रांझा, रोमियो-ज्युलिएट वगैरे टाईपचे प्रियकर-प्रेयसी कथांमध्ये असतात. वर्तमानात नाही. कारण जीवनात व्यवहारी असावं लागतं, असं जयचं तत्वज्ञान आहे.
लव्ह कल
IFM
IFM
वीरसिंह पहिल्यांदा हरलीनला पाहतो, तेव्हा त्याचे 'होश' उडतात. लग्न करीन तर हिच्याशीच आणि याच काय पण पुढच्या जन्मातही हीच माझी बायको, असेल अशी प्रतिज्ञाही घेतो. तिला पहाण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून तो तिच्या बाल्कनीखाली उभा रहातो. किमान एकदा तरी ती नजरेस पडेल, ही आशा त्याच्या मनात आहे.
लव्ह आज कल
IFM
IFM
जय प्रेमविषयक घडामोडी इतक्या हलक्याने कशा घेतो, हे वीरला कळत नाही. रोजच्या जीवनातला प्रेम हा घटक हे जयचे तत्वज्ञान आहे. वीर आपल्या आयुष्यात प्रेमासाठी इतका वेडा कसा झाला होता, याचेच त्याला आश्चर्य वाटते. पण कथा पुढे सरकते, तसे नात्यांचे वेगवेगळे रंग खुलायला लागतात.
निर्माता : सैफ अली खान, दिनेश विजान दिग्दर्शक : इम्तियाज़ अली गीतकार : इरशाद कामिल संगीतकार : प्रीतम चक्रवर्ती कलाकार : सैफ अली खान, दीपिका पदुकोण, नीतू सिंह, ऋषि कपूर, राहुल खन्ना, वीर दास