बॅनर : बालाजी मोशन पिक्चर्स निर्माता : एकता कपूर, शोभा कपूर दिग्दर्शक : मिलन लुथरिया संगीत : प्रीतम चक्रवर्ती कलाकार : अजय देवगन, कंगना, इमरान हाशमी, प्राची देसाई, रणदीप हुडा आणि गौहर खान
PR
‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई’ हे चित्रपट एका पोलिस ऑफिसरच्या नजरेतून दाखवण्यात आले आहे. याची कथा 70 च्या दशकातील आहे. जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डचा चेहरा बदलत होता. ते कसे सुरू झाले व त्याचे काय कारण होते, ह्या सर्व गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहे.
PR
1970 साली मुंबईमध्ये सुलतान (अजय देवगन) चा उदय झाला व त्याने अंडरवर्ल्डच्या जगात लवकरच आपले पाय उभारणे सुरू केले. मुंबईमध्ये त्याचे नाव चालत होते. शोएब (इमरान हाशमी) कधी त्याच्या बरोबर काम करत होता, पण तोच शोएब आता सुलतानच्या बरोबरीने उभा असतो.
PR
अजय देवगनची भूमिका हांजी मस्तानहून प्रेरित झालेली आहे, त्या काळातील मुंबई दाखवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली आहे. कलावंतांचे हाव-भाव आणि पोशाख प्रेक्षकांना त्या काळात नेतो.