निर्माता : रवी चोप्रा व डेव्हिड हॅमिल्टन दिग्दर्शक : दीपा मेहता संगीतकार : मायचल डन्ना कलाकार : प्रीती झिंटा, वंश भारद्वाज, गीतिका शर्मा
पंजाबात रहाणार्या चांदचे (प्रीती झिंटा) लग्न कॅनडात रहाणार्या रॉकीशी (वंश भारद्वाज) ठरते. रॉकीला ती कधीही भेटलेली नाही. रॉकी पंजाबात येऊन तिच्याशी लग्न करतो आणि तिला घेऊन पुन्हा कॅनडात जातो. तिथे गेल्यानंतर रॉकी आणि त्याच्या कुटुंबियांबाबतची माहिती कळते. रॉकी एक साधा टॅक्सी ड्रायव्हर असतो. पण आपले कुटुंब कॅनडात स्थापित करण्यासाठी त्याचा आटापीटा चाललेला असतो. त्यासाठीच तो सगळा पैसा खर्च करत असतो. शिवाय घरचे प्रश्न असतात ते वेगळे. आई व वडिलांची त्याला चिंता आहे. बहिण आणि तिचा नवरा व त्यांची मुले यांच्या संसाराचीही त्यालाच काळजी आहे. हे सगळे लोक एका छोट्या घरात रहाताहेत. सहाजिकच भांड्याला भांडे लागतेच आहे.
IFM
सुशिक्षित चांदला आपला वर्तमान आणि भविष्य कळून चुकते. सासरच्यांकडून बोलणी आणि नवर्याकडून मार खाणे एवढेच तिच्या नशीबी येते. तिचा नवराही तिला दासी म्हणूनच वागणूक देतो. या सगळ्या त्रासातून सुटका होण्यासाठी चांद एका कारखान्यात काम करायला लागते. तिथे तिला रोजा भेटते. तिलाही चांदचे दुःख कळते. रोजा तिला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. पण त्यातूनही मार्ग सापडतोच असे नाही. तिच्या या प्रवासाची कहाणी म्हणजेच 'विदेश' हा चित्रपट आहे.