बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

'सास, बहू और सेंसेक्स'

सास
IFMIFM
निर्माता : जयश्री माखीजा
दिग्दर्शक : सोना उर्वशी
कलाकार : तनुश्री दत्ता, अंकुर खन्ना, फारुख शेख, किरण खेर, मासूमी माखीजा, लिलेट दुबे

भारताच्या बदलत्या चेह-याची अोळख करून देणारा ‘सास, बहू और सेंसेक्स’ हा चित्रपट आहे. सेंसेक्स ही या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. पैसा कमावताना त्याचा योग्य त्याठिकाणी विनियोग झाला पाहिजे, हे सांगण्याचा प्रदत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

IFMIFM
कलकत्त्यात सगळ्या सुखसोयींयुक्त घरात राहणारी नित्या (तनुश्री दत्ता) आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आईबरोबर मुंबईत येते. पण, ऐषआरामात राहण्याची सवय जडली असल्याने तिला आईबरोबर साधेपणाने राहणे कठीण जाते. ती याचा दोष आईला देऊ लागते. परदेशात जाऊन एमबीएचे शिक्षण घेण्याची तिची इच्छा असते. पण, घरचालविण्यासाठी तिला एका कॉलसेंटरमध्ये नोकरी करावी लागते. त्याठिकाणी रितेश जेठमलानी या युवकाशी तिची अोळख होते. तो तिची शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो. नित्या त्याच्यावर प्रेम करू लागते.

IFMIFM
इकडे तिची आई बिनिता, जुन्या आठवणी विसरण्यासाठी किटीपार्टीत मन रमवते. आपल्या मुलीचा राग काही दिवसांनी शांत होईल आणि ती नव्या जीवनात सुखी होईल अशी तिची अपेक्षा असते. एकदिवस ती आपल्या माहेरी जाते. त्याठिकाणी तीला शेअर आणि स्टॉक मार्केटची काही कागदपत्रे मिळतात. ही कागदपत्रे समजून घेण्यासाठी ती फिरोज सेठना (फारुख शेख) या स्टॉक ब्रोकरकडे जाते. तो शेयर मार्केटमध्ये पैसा गुंतविण्याची माहिती देतो. बिनिता आपल्या किटी पार्टीतल्या सदस्यांबरोबर शेयर मार्केटमध्ये पैसा गुंतविण्यास सुरुवात करते.

करोडपती व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा असणा-या कीर्ती वागस्कर (मासूमी) व रितेशचे लग्न ठरते. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येतो तशी नित्या उदास होत जाते. तिची समजूत काढण्याचा बिनीता प्रयत्न करते. एका करोडपती व्यक्तीशी लग्न केल्यामुळे आलेला अनुभव ती सांगते. एका मुलीसाठी वडिलांनी आपल्या दोघींना सोडल्यामुळे आपणास मुंबईस यावे लागल्याचे ती सांगते. शेवटी रितेशचे लग्न कोणाबरोबर होते? बिनिता व नित्या मुंबईत कशा राहतात? हे जाणून घेण्यासाठी पाहावाच लागेल, 'सास, बहू और सेंसेक्स'