मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

स्लमडॉग मिलियनेयर

स्लमडॉग मिलियनेयर
IFM
निर्माता - क्रिश्चियन कॉलसन, टेसा रॉस, पॉल स्मिथ
निर्देशक - डॅनी बॉयले
संगीत - ए.आर. रहमान
कलाकार - देव पटेल, फरीदा पिंटो, अनिल कपूर, इरफान खान,

सध्या रियॅलिटी शो ची चांगलीच चलती आहे. प्रत्येक चॅनेल्सवर एक ना एक रियॅलिटी शो सुरू आहे. या कार्यक्रमांची इतकी लोकप्रिय होत आहेत की, आता बॉलीवूडलाही याची दखल घ्यावी लागली आहे. 'स्मलडॉग मिलियनेर' ची निर्मिती याच धर्तीवर आहे. कॉल सेंटरमध्ये चहा देण्याचे काम करणारा जमाल मलिक (देव पटेल) हा युवक 'हू बिकम मिलियनेयर' मध्ये विजेता होऊन एका रात्रीत लोकप्रिय होतो आणि करोडो रूपयांचा मालक होतो ही या चित्रपटाची मुख्य थिम आहे.

IFM
या कार्यक्रमास पाहुणे म्हणून आलेले प्रेम कुमार (अनिल कपूर) आणि पोलिस त्याच्यावर आक्षेप घेतात. त्याने चुकीच्या मार्गाने ही स्पर्धा जिंकल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जमाल मिलियनेयर कसा बनला ते फक्त पोलिस इंस्पेक्टर (इरफान खान) यांनाच माहित आहे.

जमाल यांचे बालपण मुंबईतील झोपडपट्टी्त गेले. अमिताभ बच्चन यांचा फॅन असणारा जमाल अमिताभ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी कशाचीही पर्वा न करता नाल्यात डुबकी मारतो. मुंबईतील दंगलीत त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो व त्याचा भाऊ सलीम रस्त्यावर येतात. दंगलीत कुटूंब गमावलेल्या लतिका (फरीदा पिन्टो) या एका मुलीशी त्यांची भेट होते पण, दुदैवाने ते भिम मागवून घेणा-या टोळीच्या हाताला लागतात. कसेतरी करून तो आपली व सलीमची सुटका करून घेतो पण, लतिकाला पळवून नेण्यात त्याला यश येत नाही.

IFM
दोघे भाऊ आग-यात येतात. पण, तेथेही नशिब त्यांना साथ देत नाही आणि ते पुन्हा मुंबईत परततात. जमाल लतिकाला शोधण्‍याचा प्रयत्न करत असतो. शेवटी एका आंधळ्या भिका-याच्या मदतीने तो लतिकापर्यंत पोहोचतो. ती रेडलाइट एरियात असते. दोन्ही भाऊ तिला सोडवितात पण, या झटापटीत जमालच्या हातून खून होतो.


मोठा झाल्यावर जमाल कॉल सेन्टर मध्ये चहा देण्याची नोकरी करू लागतो. कधी कधी तो तेथील कर्मचा-यांचे काम सांभाळतो. अनेक वर्षांनी त्याची आपल्या मोठ्या भावाशी भेट होते. तो जावेद भाई (महेश मांजरेकर) साठी काम करत असतो. त्याचे प्रेम अर्थात जमाल लतिका जेवेदभाईकडेच असते. दरम्यानच्या काळात जमालला 'हू बिकम मिलियनेयर' मध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि शेवटी तो पैशाबरोबरच आपले प्रेमही मिळवतो.