नील (जिमी शेरगिल) कोलंबिया विद्यापीठात शिकतोय. मायावर (निशा रावल) मनोमन प्रेम करतोय. माया न्यूयॉर्कच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे करीयर करायचे तर इथेच, हे तिने ठरविले आहे.
सनी मल्होत्रा (राजपाल यादव) हा नीलचा मित्र. मुलींची छेड काढणे ही त्याची सवय आहे. टीना (सारा थॉमस) त्याला खूप आवडते. त्याच्या या मुलींच्या मागे होत असलेल्या पळापळीतून अनेक विनोदी प्रसंगांची निर्मिती होते.
IFM
IFM
नीलला भारतात एक कॉल सेंटर चालवायचा प्रस्ताव मिळतो. करीयरची उत्तम संधी चालून आलेली पाहून नील ती दवडत नाही. पण माया मात्र त्याच्या या निर्णयाच्या विरोधात आहे. पण नील सनीसह भारतात परततो.
भारतात नीलची गाठ तन्वीशी (मोनिष्का) पडते. तन्वी नीलला खूप मदत करते. हळूहळू ती त्याच्या प्रेमातही पडते. येनकेनप्रकारे नील आपल्याही प्रेमात पडावा यासाठी तिचा प्रयत्न सुरू होतो. पण नील तिला भिक घालत नाही. त्याच्या मनात फक्त माया आहे.
IFM
IFM
तन्वीला मात्र हे सहन होत नाही. ती बदला घेण्याची योजना आखते. मग तिच्या या योजनेमुळे नील उध्वस्त होण्याची वेळ येते. तन्वीची ही योजना यशस्वी होते का? नील व माया एकत्र येतात का? अडचणींच्या डोंगरातून नील मार्ग काढू शकतो काय?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी 'हंसते हंसते पहावा लागेल.