बुधवार, 31 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

९९

९९ सिनेगप्पा
IFM
निर्माता : अनुपम मित्तल, आदित्य शास्त्री
दिग्दर्शक : राज निदिमोरू, कृष्णा डीके
गीतकार : वैभव मोदी
संगीतकार : शमीर टंड
कलाकार : कुणाल खेमू, सोहा अली खान, बोमन ईरानी, सिमोन सिंह, महेश मांजरेकर, विनोद खन्ना

९९ च्या फेर्‍यात आपल्या सचिन तेंडुलकरसह अनेक जण अडकतात. १०० हा आकडा गाठण्यासाठी धडपड सारखी सुरू असते. तरीही अनेकदा ९९ मध्येच अडकून जायला होतं. ९९ हा चित्रपटही अशाच ९९ च्या फेर्‍यात अडकलेल्यांविषयी भाष्य करतो.

चित्रपटाचा काळही १९९९ हाच आहे. सर्व पात्रे ९९ च्या फेर्‍यात अडकलेली आहेत. यात प्रणय आणि विनोदाच्या मसाल्याला वेगवान गती आणि चमकोगिरीचा तडका दिला आहे.

पात्रपरिचय

IFM
सचिन (कुणाल खेमू) - सचिनकडे कल्पनांची कमी नाही. पण त्या त्याला अमलात आणता येत नाहीत. त्याला कुणीही मदत करत नाही.


IFMIFM
पूजा (सोहा अली खान) - ही टिपीकल दिल्ली गर्ल आहे. पण तिच्या आयुष्याला एक वेगळा एंगलही आहे, तो फारसा कुणाला माहित नाही.


IFM
राहूल (बोमन इरानी) - हा एक सामान्य माणूस आहे. नशीब कसे काम करते हे आपल्याला माहित आहे, असा त्याचा दावा आहे.


IFM
जेसी (विनोद खन्ना)- स्टायलिश जीवन जगणारी ही असामी मोठमोठे डाव खेळते. जिंकणेच त्याला आवडते.