शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

‘झूठा ही सही’

‘झूठा ही सही’
बॅनर . सारेगामा-एचएमवी
निर्माता : मधु मंटेना
दिग्दर्शक : अब्बास टायरवाला
संगीत : ए.आर. रहमान
कलाकार : जॉन अब्राहम, पाखी

आपल्याला आवडणार्‍या व्यक्तीसाठी आपण कधी-कधी खोटे बोलण्‍याचा प्रयत्न करत असतो. त्या व्यक्तीला आपल्याकडष आकर्षित करण्‍यासाठी खोटेपणा आपल्या अंगवळणी पडतो, आणि एकेदिवशी खरे काय हे सांगण्‍याची वेळ आपल्यावर येते, आणि मग मनात द्वंद चालू होते, खरं सांगायचं का आपल्या आवडत्या व्यक्तीला फसवायचं? या सार्‍यांचा मेळ म्हणजेच झूठा ही सही.

चित्रपटातील कथा सिद्धार्थ अर्थात सिड भोवती फिरते. सिद्धार्थला रॉंग नंबर येत असतात. त्याला नेहमीच लंडनच्या सुसाइड हेल्पलाइनचे फोन येतात. आत्महत्या करणार्‍या व्यक्ती जगण्याचे कारण विचारत असतात.

असेच एके दिवशी सिडला मिष्काचा फोन येतो. मिष्का व त्याच्यात जवळीक निर्माण होते. सिड मिष्काला पटवण्‍यासाठी अनेकदा खोटे बोलतो. आपल्याला ट्रेकिंगचा छंद आहे. फिरण्‍याचा नाद आहे. आपल्याकडे पाळलेल्या शार्क आहेत.

खोटेपणाची यादी त्याची वाढतच जाते. आता आपण खरे बोलल्यास मिष्का आपल्यावर नाराज होईल अशी भिती त्याला वाटते आणि मग त्याच्या मनात सुरु होते खर्‍या खोट्याचे द्वंद.