- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - आगामी चित्रपट
‘नॉक आऊट’
नॉक आऊट हा अत्यंत गतिमान जीवनावर आधारीत चित्रपट आहे. दुपारी 11 ते 1 दरम्यानच्या घडणार्या घटनांवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. संजय दत्त एक रेंजर असतो. त्याला शस्त्रांची आवड असते. त्याला स्वत:वर इतका विश्वास असतो, की तो दुसर्यांवर मुळीच विश्वास ठेवत नसतो. त्याला एकट्याला काम करायला आवडत असते. काम जितके जोखमीचे तितके ते करण्यात मजा जास्त असे त्याचे म्हणणे असते. या चित्रपटात कंगणा राणावतकडे एका पत्रकाराचे काम देण्यात आले आहे. तिला सत्याचे भयंकर वेड असते. ती सत्य समोर आणण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असते. असा हा चित्रपट काही व्यक्तीरेखांभोवतीच फिरणारा आहे. या चित्रपटात नेमके काय होते हे पहाण्यासाठी कथा ऐकण्याऐवजी हा चित्रपट पाहिलेलाच बरा.