शुक्रवार, 6 मार्च 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

‘सिंग इज किंग’

‘सिंग इज किंग’
गीतकार : मयूर पुरी
संगीतकार : प्रीतम
कलाकार : अक्षय कुमार, कैटरीना कैफ, ओमपुरी, किरण खेर, सोनू सूद, नेहा धूपिया, रणवीर शौरी, यशपाल शर्मा व जावेद जाफर

IFM
‘सिंग इज किंग’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. सिंगचा किंग कसा होतो, हे पाहण्यासाठी चाहत्यामध्ये कमालीची उत्सुकता असून तो कधी रिलीज होतो यासाठी ते आतुर झाले आहेत. पुढच्या महिन्यात 8/8/8 या महुर्तावर ‘सिंग इज़ किंग’ मोठ्या थाटात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे टायटल व अक्षय-कैटरीना ही लकी जोडी आहे.

पंजाब, ऑस्ट्रेलिया व इजिप्तमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून प्रणय, ग्लॅमर, विनोद व सुपर हिट गीते या जमेच्या बाजू आहेत. प्रितम यांनी दिलेले अप्रतिम संगीत हे ‘सिंग इज किंग’ च्या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील.

पंजाबमधल्या एका छोट्याशा गावातला लखनसिंह उर्फ लकी (सोनू सूद) ऑस्ट्रेलियातील अंडरवर्ल्डचा ‘किंग’ असून त्याच्या गॅंगमध्ये जावेद जाफरी, नेहा धूपिया, मनोज पाहवा, यशपाल शर्मा, कमल चोपड़ा व सुधांशु पांडे आदी पंटर आहेत.

IFM
लकीचा जन्म पंजाबमधल्या ज्या छोट्याशा गावात झाला त्याच गावात हॅप्पी सिंग (अक्षय कुमार) राहत असतो. मात्र हॅप्पी लकीपेक्षाही गावात बदनाम असतो. त्याच्या स्वैर वागण्याने गावकर्‍यांच्या नाकी नऊ आलेले असतात. हॅप्‍पीचा त्रास चुकविण्यासाठी गावकरी त्याला गावापासून कुठे तरी दूर पाठविण्याचा निर्णय घेतात. हॅप्पीने ऑस्ट्रेलियाला जाऊन लकीला परत आणावे, कारण त्याच्या कृत्याने ऑस्ट्रेलियामध्ये गावाची अब्रू मातीत मिळाली आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

हॅप्पी ग्रामस्थांकडून मिळालेला प्रस्ताव स्वीकारतो व हे मिशन समजून कामाला लागतो. हॅप्पीचा मित्र टोनी सिंग (ओमपुरी) ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी करतो. मात्र, टोनी हॅप्पीवर संतापलेला असतो. कारण त्याला इच्छा नसताना हॅप्पीबरोबर जावे लागते.

IFM
पंजाब ते ऑस्ट्रेलियाच्या प्रवासात हॅप्पीला सोनिया (कैटरीना कैफ) भेटते व हॅप्पीच्या मिश्कील स्वभावावर लट्टू होते. कालांतराने त्यांच्यात गुटूर्गु सुरू होते. हॅप्पी मिशनपर्यंत पोहचेपर्यंत बरेच विनोदी प्रसंग घडतात. त्यात हॅप्पीच्या जवळचे सर्व पैसे संपून जातात. तेव्हा त्याच्या नशिबाने एक महिला (किरण खेर) भेटते ती त्याला मदतीचा हात देते.

चित्रपट पुढे सरकतो तसतसे विनोदाचे फवारे उडायला सुरूवात होते. चित्रपटाचे कथानक परतीच्या प्रवासाला लागते तेव्हा लकीला हॉस्पिटलमध्ये भरती हेण्याची वेळ येते. तेव्हा सगळ्यांची अशी अपेक्षा असते की, हॅप्पीनेच 'किंग'व्हावे.

हॅप्पी 'सिंग' चा 'किंग' कसा होतो, हे आता प्रत्यक्ष चित्रपटातच बघूया!

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....