1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा

ई.एम.आय- पचायला ''इझी'' नाही

IFMIFM
निर्माता - सुनील शेट्टी, शब्बीर ई. बॉक्सरवाला, शोभा कपूर, एकता कपूर.
दिग्दर्शक - सौरभ काबरा
संगीत - चिरंतन भट्ट
कलाकार - संजय दत्त, उर्मिला मातोंडकर, अर्जुन रामपाल, मलाइका अरोरा खान, आशीष चौधरी, नेहा ओबेरॉय, कुलभूषण खरबंदा, मनोज जोशी, दयाशंकर पांडे

फायनान्स कंपनी, बॅंक व पतसंस्थांकडून कर्ज घेऊन चैनीच्या वस्तू खरेदी करून मजा मारण्याची प्रवृत्ती चांगलीच फोफावली आहे. वस्तू खरेदी करा आणि ई.एम.आय (ईझी मंथली इंस्टॉलमेंट) भरा हा आजचा फंडा आहे. म्हणूनच बाजारात सध्या ईएमआयची चलती आहे. हाच विषय हेरून दिग्दर्शक सौरभ काबराने 'ई.एम.आय.' काढला आहे.

एका चांगल्या सुरवातीनंतर 'ई.एम.आय.' नेहमीच्याच मसाला चित्रपटांसारखा बनतो. चित्रपटाच्या अंतर्गत चार उपकथा आहेत. चित्रपटात 'भाई' आहे. आतापर्यत 'मुन्नाभाई' म्हणून बॉलीवूडमध्ये ओळखला जाणारा संजूबाबा 'ईएमआय'मध्ये 'सत्तारभाई' आहे. हा सत्तारभाई कर्जदारांकडून पैसा वसुल करतो. पण अनेकांच्या समस्याही हा भाई सोडवतो. लोकांकडून जबरीने वसुली करणारा सत्तारभाई अचानक बदलतो. घेणेकर्‍यांच्या समस्या तो सोडवायला लागतो. अगदी प्रेमातही पडतो. त्याचवेळी विषय सोडून चित्रपट बाजूला जातो. दिग्दर्शक सौरभ काबराने विषय दमदार निवडला आहे. पण मांडणी चांगली केलेली नाही. कथा कुठे तरी भरकटते. सहाजिकच कलावंतांचाही ठिकाणा लागत नाही. संगीत तर बेसुरे आहे.

संजय दत्तने ‘सत्तारभाई’ मस्त पेश केला आहे. अर्जुन रामपाल व कुलभूषण खरबंदा यांचीही कामेही मस्त आहेत. पण उर्मिला मातोंडकरला अजिबात संधी नाही. एकुणात 'ईएमआय' पचायला तेवढा 'इझी' नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा