गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By वेबदुनिया|

कॅश

कॅश
PRPR

निर्माता : अनीष
दिग्दर्शक : अनुभव सिन्हा
संगीत : विशाल-शेखर
कलाकार : अजय देवगण, रितेश देशमुख, झायेद खान, शमिता शेट्टी, इशा देवल, दिया मिर्झा, सुनील शेट्टी

कॅश चित्रपटात दसच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या अंगलट आला आहे. 'दस' च्या तुलनेत 'कॅश' सात सुद्धा नाही. चित्रपटास स्टायलिश बनवण्याच्या प्रयत्नात कथानकाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चोरीसाठी तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्यार्‍या बुद्धिमान चोरांच्या टोळक्याभोवती कथानक फिरते.

अजय देवगण व सु‍नील शेट्टीची गँग मौल्यवान हिर्‍याच्या मागावर असते. हिर्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी शमिता शेट्टीवर असते. शमिता अजयच्या प्रेमात असते, मात्र तिला त्याच्या कारस्‍थानाबाबत अजिबात माहिती नसते. कोट्यावधी रूपयांच्या हिर्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवलेल्या शमितास आपल्या प्रियकराबद्दलच काहीच माहित नाही यावरून असे पोलिस कुठे असतात असा प्रश्न पडतो.

दिग्दर्शक अनुभव सिन्हाने चित्रपटातील कमकुवत दुवे झाकण्यासाठी चित्रपटाला प्रचंड वेग दिला आहे. प्रेक्षकांना डोके खाजवण्याची उसंत मिळू नये याची त्याने पूर्ण काळजी घेतली आहे. उत्तरार्धात वेग थोडा कमी‍ झाल्याने प्रेक्षकांना हे काय चाललेय असा विचार करायला वेळ मिळतो.
PRPR


दिग्दर्शकाने कथानकाऐवजी स्टंट दृश्यांवर जास्त मेहनत घेतली आहे आणि तिथेही चलाखी केली आहे. दिग्दर्शकाच्या कल्पनेप्रमाणे स्टंट दृश्य करणे महाकठीण काम होते. शिवाय त्यासाठी पैसा खूप लागला असता. त्यामुळे त्याने शक्कल लढवून सरळ ऍनिमेशनच साहय्याने ती दृश्ये चित्रीत केली. त्यामुळे विमानातून पैसे लुटण्याचे दृश्य हास्यास्पद झाले आहे. चित्रपटातील प्रसंग पापणी लवण्याच्या आत बदलत असल्याने विचार करण्यासा पुरेसा वेळही मिळत नाही.

चित्रपटात प्रणयास काहीच स्थान नाही. विनोदाचाही दुष्काळ आहे. अजय व शमितामधील एक दृश्य तेवढे चेहऱ्यावर हसू आणते. अजय देवगण फारसा खुललेला दिसला नाही. त्याने दोनदा सांगितलेला किस्सा अस्पष्ट उच्चारणांमुळे समजत नाही.

PRPR
रितेश तर झोपेतून सरळ सेटवर आल्यासारखा भासतो. झायेद जरा बरा वाटला. सुनील शेट्टी प्रत्येक चित्रपटात सारखाच वाटतो. नायिकांमध्ये शमितास अधिक वाव आहे. तिने आपली भूमिका चांगली साकारली आहे. दिया सुंदर दिसली, मात्र इशाचा मेकअप तिला सुट होत नाही. विशाल-शेखरचे संगीत चित्रपटाच्या प्रकृतीशी साधर्म्य राखते. 'माइंडब्लोइंग माहिया' हे गाणे चांगले जमले आहे. रेमो व राजीव गोस्वामींचे नृत्यदिग्दर्शन उत्तम. एकंदरीत काय तर कॅश म्हणजे बाजारात काहीहीह किंमत नसलेली नोट आहे.