'गुलाल'-हिंसा आणि व्देश
|
दिग्दर्शक - अनुराग कश्यप
गीत-संगीत - पीयुष मिश्रा
कलाकार - केके मेनन, आदित्य श्रीवास्तव, दीपक डोब्रियाल, जेसी रंधावा, माही गिल, पीयुष मिश्रा, आदित्य श्रीवास्तव
ए-सर्टिफिकेट
अनुराग कश्यप यांनी आठ वर्षांपूर्वीच 'गुलाल'ची कथा लिहिली होती. त्यावेळी ते व्यथित होते आणि या कथेतून त्यांनी राग उतरवला होता. पण, या चित्रपटासाठी त्यांना निर्माता मिळाला नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी इतर कथा लिहिल्या. पण, हा चित्रपट व्हायचाच होता आणि अखेर या चित्रपटाची निर्मिती झाली.
|
महाविद्यालयामध्ये शिकणारा दिलीप (राजसिंह चौधरी) हा नाकासमोर चालणारा मुलगा असतो. तो वह रांसा (अभिमन्यू सिंह) बरोबर रहत असतो. बना (केके मेनन) रजपुतांच्या स्वतंत्र राज्यासाठी पैसे आणि युवासंघटन करत असतो. युवकांच्या माध्यमातून त्यांना माया गोळा करायची असते त्यामुळे तो विद्यार्थ्यांच्यात राजकारणाचे भूत निर्माण करतो.
तो रांसाला जनरल सेक्रेटरीपदाची निवडणूक लढविण्यास भाग पाडतो. पण, निवडणूकीपूर्वीच त्याचा खून होतो. ऐनवेळेचा उमेदवार म्हणून दिलिपचे नाव पुढे केले जाते. आणि तो निवडून येतो.
|
|
|
'गुलाल' सुरुवात पाहता आशा पल्लवीत होतात पण, मध्यतरानंतर कंटाळवाणा वाटतो. अनुराग कश्यप यांनी लेखक म्हणून उत्तम कथानक लिहिले असले तरी दिग्दर्शक म्हणून सादरीकरणात त्यांची पक्कड कुठेतरी सुटल्यासारखी वाटते. राजकारणापासून प्रेमकथेपर्यंत अनेक विषय हाताळताना अनेक मुद्दे अर्धवटच राहिले आहेत.
राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारीत असणा-या या चित्रपटात नवीन असे काहीच नाही. या धर्तीवर अनेक चित्रपट झाले आहेत. खून आणि मारामारीमध्ये पोलिसांचाही रोल असतो हे दिग्दर्शक विसरलेले दिसतात. चित्रपट समजण्यासाठी प्रेक्षकांना मागच्या घटना लक्षात ठेवाव्या लागतात.
पीयुष मिश्राची गाणी चित्रपटात रंग भरतात. अभिनयाविषयी बोलाल तर सगळ्याच कलाकारांचा प्रयत्न चांगला आहे. केके मेनन (बना), राजसिंह चौधरी (दिलीप), अभिमन्यू सिंह (रांसा), पंकज झा (जडवाल), दीपक डोब्रियाल आणि आयशा मोहन यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. जेसी रंधावाला मात्र कमीच संधी मिळाली.

