1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा

'चल चला..' -सहनशीलतेची कसोटी

निर्माता - माना शेट्टी, जीपी विजय, धर्मेश रोजकोटिया
दिग्दर्शक - राजीव कुमार
संगीत - अनु मलिक, आनंद राज आनंद
कलाकार - गोविंदा, रीमा सेन, राजपाल यादव, असरानी, मनोज जोशी, उपासना सिंह, अमिता नांगिया, ओम पुरी, मुरली शर्मा, रज्जाक खान, आसिफ बसरा

'चल चला चल'या चित्रपटात काहीच पाहण्यासारखे नाही. टाकाऊ कथानक, बकवास दिग्दर्शन, सर्वच कलाकर अभिनयाच्या नावाखाली आरडाओरडा करतानाचे दिसून येतात. या चित्रपटला विनोदी म्हटले तर तोच एक मोठा विनोद होईल. चित्रपटाचे कथानकात 35-40 वर्षांपूर्वीच्या घटना दाखविण्यात आल्या आहेत मात्र, हा चित्रपट त्या काळात प्रदर्शित झाला असता तरी दणकून पडला असता.

IFM
दीपक (गोविंदा) थोडासा बावळट आहे.त्याला भ्रष्टाचार मुळीच खपत नसल्याने त्याचे कुणाशी पटत नाही त्यामुळे तो सातत्याने नोक-या बदलत असतो. त्याचे वडील ओंकारनाथजी हे खासगी शाळेत मुख्याध्यापक होते. पण, शाळेने त्यांची पेन्शन रोखून ठेवल्याने ते शाळेविरुद्ध न्यायालयीन लढा देत आहेत. ओंकारनाथजी यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे पण, त्यांचा पैसा आणि वेळ खर्च होत आहे. याबाबतीत दीपक त्यांची मदत करतो आहे.

एक दिवस त्यांच्या बाजूने निकाल लागतो पण, शाळेकडे पैसे नसल्याने शाळेच्या मालमत्तेतील वाटा देण्याचे आदेश न्यायालय देते. दीपकच्या वडिलांना शाळेची एक बस स्कूल मिळते. ही बस चालवून पैसे कमाविण्याचा ते विचार करतात आणि दीपकलाही ही कल्पना पटते. पण, त्याच्या दोन बहिणी छाया, अपर्णा (उपासना सिंह आणि अमिता नांगिया) तसेच जावई विनायक अग्रवाल (असरानी) आणि यूयू उपाध्याय (मनोज जोशी) यांना वडिलांचे म्हणणे मुळीच पटत नाही. बस चालविणे चांगले काम नाही, असे त्यांचे म्हणणे असते. बस विकण्याचा ते सल्ला देतात.

IFM
दीपकचा मित्र सुंदर (राजपाल यादव) अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. तो दीपकबरोबर 'चल चला चल ट्रान्स्पोर्ट' ही कंपनी सुरू करतो. पण, बस एकदमच खटारा असल्याने ती दुरुस्त करण्यासाठी त्यांचा खूप पैसा खर्च होतो. दीपक आपल्या बससाठी बसंतीलाल (रज्जाक खान) या ड्रायवर आणि हरीलाल (आसिफ बसरा) या कंडक्टरची नेमणूक करतो. बसंतीलालच्या डोळ्यावर मोठा चष्मा तर हरीलालची नजर नेहमीच हेरफेरीकडे असते. येथेही दीपकच्या मागे भ्रष्टाचार लागतोच. थोड्याच दिवसात त्या दोघांवर दीपक वैतागून जातो पण, ते दोघे युनियन लीडर मि. सिंह (मुरली शर्मा) याच्या जवळचे असल्याने तो त्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही.

या बसमधून पायल (रीमा सेन) नेहमीच प्रवास करत असते. तिचे दीपकवर प्रेम जडते. पण, येथेही दीपक अडचणीत येतो. एक दिवस पायलला बसची धडक बसते आणि तिचे हाड मोडते. ती सुद्धा दीपककडून पैसे वसूल करण्याच्या मूडमध्ये असते. एकानंतर एक संकटात सापडलेला दीपक आपली सुटका करून घेतो.

या चित्रपटासाठी खरोखरीच खुप सहनशीलता गरजेची आहे. गोविंदाच्या अभिनयाबाबत बोलायचे झाले तर त्याने आपल्या वयाला शोभतील अशा भूमिका केल्या पाहिजेत. राजपाल यादवचा अभिनय चांगला आहे पण त्यानेही ओव्हरएक्टींग केली आहे. ओम पुरी यांनी हा चित्रपट का स्विकारला? असा प्रश्न त्यांना करावासा असरानी, मनोज जोशी, रझाक खान, उपासना सिंह आणि रीमा सेनने अभिनयाच्या नावावर केवळ टाईमपास केल्याचे जाणवते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा