चित्रपट परीक्षण: ऑल इज वेल
अक्षयकुमार-परेश रावल स्टारर ‘ओह माय गॉड’ चे दिग्दर्शन केलेल्या उमेश शुक्लांची ही ऑल दि बेस्ट फिल्म आहे. वडील-मुलाच्या नात्यावर हा सिनेमा भाष्य करतो. भजनलाल भल्ला (ऋषी कपूर)ह्यांची कसोलीमध्ये एक बेकरी आहे. पण ती सध्या तोट्यात चाललीय. आणि ते त्यामुळे कर्जात बुडालेत. आणि अर्थातच सार्या अपयशाची कारणीभूत आपली पत्नी पम्मी (सुप्रिया पाठक) असल्याचे ते मानतात. त्यांचा मुलगा(अभिषेक बच्चन) बँकॉकमध्ये गायक बनायला गेला आहे. पण हालाखीच्या परिस्थितीमुळे इंदर भारतात परततो. आणि वडिलांची बेकरी विकून टाकतो. त्याचवेळी त्याला निम्मी(आसिन)शी प्रेम होतं. पण आई-वडिलांमधले सततचे मतभेद पाहिल्याने निम्मीशी लग्नाची तो कमिटमेंट करत नाही.
उमेश शुक्लांना ह्या चित्रपटात कॉमेडी, रोमांस, एक्शन असं बहुधा सगळंच दाखवण्याची घाई झाली असल्याने अनेक ठिकाणी चित्रपट घाईघाईत उरकल्यासारखा वाटतो. ह्यात अभिषेकचे कॉस्टूयम सारखे का बदलले जात आहेत, ते कळतच नाही. पम्मीला अलझायमर झालेला असताना ती सुध्दा मध्येच चमत्कार झाल्यासारखी ठीक कशी होते. त्याचेही उत्तर मिळत नाही.
आसिन तर फक्त अभिषेकशी रोमांस करण्यापुरतीच फिल्ममध्ये आहे. आणि ऋषी कपूर आणि अभिषेक एकमेकांशी सारखे का ओरडून बोलतात, ते तर दिग्दर्शकालाच ठाऊक. ह्यातलं संगीतच काय ती त्यातल्या त्यात जमेची बाजू. अर्जित सिंगच्या आवाजातले बातों में तेरी, विशाल दादलानी आणि अरमान मलिकच्या आवाजातले हफ्ते में चार शनिवार आणि कनिका कपूर आणि मीत ब्रदर्स अनजानने गायलेलं नाचन फर्राटेदार श्रवणीय आहे.

