चित्रपट परीक्षण: धरम संकट मे
फवाद खान दिग्दर्शित ‘धरम संकट मे’ या सिनेमाची खासियत म्हणजे यातली तगडी स्टार कास्ट. परेश रावल, नसिरुद्दीन शहा आणि अन्नू कपूर.
एका ब्राह्मण हिंदूची ही कथा आहे. जी भूमिका साकारलीय अभिनेता परेश रावलनं तो एक कट्टर हिंदू असतो. पण एक दिवस त्याची खरीखुरी ओळख त्याला कळते. तो खरंतर एका ब्राह्मण हिंदू कुटुंबानं दत्तक घेतलेला मुसलमान मुलगा असतो. जेव्हा त्याला हे कळतं तेव्हा काय घडतं. आपल्या खर्या आई-बाबांच्या शोधात तो निघतो, पण त्याच्या आई बाबांशी त्याची भेट होऊ शकत नाही. त्याच्या पुढे एक अट घातली जाते. मुस्लिम धर्माचा अभ्यास केला तरच तो आपल्या खर्या आई-वडिलांना भेटू शकतो, अशी अट एक इमाम त्याला घालतो. यानंतर काय घडतं ही या सिनेमाची खरी मजा आहे.
या सिनेमाची संपूर्ण जबाबदारी खरं तर एकट्या परेश रावल यांनीच आपल्या अभिनयाच्या जोरावर सांभाळली आहे. सिनेमाचा पहिला भाग दिग्दर्शक फवाद खान यांनी खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं हाताळला आहे.
या सिनेमाची संपूर्ण जबाबदारी खरं तर एकट्या परेश रावल यांनीच आपल्या अभिनयाच्या जोरावर सांभाळली आहे. सिनेमाचा पहिला भाग दिग्दर्शक फवाद खान यांनी खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं हाताळला आहे.

