चित्रपट परीक्षण : सिटी लाईटस
बॅनर : विशेष फिल्म्स, फॉक्स स्टार स्टुडियो
निर्माता : मुकेश भट्ट
निर्देशक : हंसल मेहता
संगीत : जीत गांगुली
कलाकार : राजकुमार राव, पत्रलेखा, मानव कौल
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 6 मिनट 55 सेकंड
हंसल मेहताच्या चित्रपटातून पत्रलेखाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटांच सर्वत्र कौतुक होतयं. या चित्रपटात पत्रलेखा राखी नामक राजस्थानी महिलेचं काम करतेय. राखी आपल्या पती आणि मुलासह उपजीविकेसाठी मुंबईला येते आणि डांसर बनते. अशी ती कथा आहे. राखीची भूमिका चांगली वठावी किंवा एकूणच राजस्थानी माहौल वाटावा यासाठी हंसल मेहताने त्यांना राजस्थानला नेले. तिथली भाषा, राहणीमान याचा अभ्यास करायला प्रोत्साहन दिले. याचा परिणाम चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटाने अनेकांनी कौतुक केले. एवढंच नव्हे, तर आलिया भट्टने जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा तिला अश्रू आवरता आले नाहीत आणि तिने पत्रलेखाला जवळ हेऊन कौतुक केले. तर सिध्दार्थ रॉय आणि विद्या बालननेही तारीफ केली आहे.
