1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
  4. चित्रपट परीक्षण : ‘हमशकल्स’

चित्रपट परीक्षण : ‘हमशकल्स’

बॅनर : फॉक्स स्टार स्टुडियो, पूजा एंटरटेनमेंट इंडिया लि.
निर्माता : वासु भगनानी 
दिग्दर्शक : साजिद खान
संगीत : हिमेश रेशमिया
कलाकार : सॅफ अली खान, बिपाशा बसु, रितेश देशमुख, तमन्ना भाटिया, ईशा गुप्ता, राम कपूर, सतीश शाह, चंकी पांडे
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 39 मिनिट 33 सेकंड
 
साजिद खान निर्माता-दिग्दर्शित विनोदी चित्रपट ‘हमशकल्स’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. फिल्ममध्ये मुख्य भूमिका सैफ अली खान, रितेश देशमुख आणि राम कपूर यांनी केली आहे. विशेष म्हणजे या तिघांनी फिल्ममध्ये तीन-तीन भूमिका केल्या आहेत. अशोक सिंघानिया (सैफ अली खान) लंडनचा खूप मोठा उद्योगपती आहे आणि त्याचे वडील कोमामध्ये असतात. अशोक आणि कुमार (रितेश देशमुख) दोघे खूप बालपणांपासूनचे मित्र आहेत. अशोकचा मामा (राम कपूर) याला त्यांची संपूर्ण संपत्ती हवी असते. त्यासाठी दोन अटी असतात की अशोक-कुमार वेडे तरी झाले पाहिजे नाहीतर कोमामध्ये गेले पाहिजेत.

मामा कट रचून अशोक आणि कुमारला वेडय़ांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो. दुसरीकडे अशोक-कुमारचे हमशकल्स त्याच वेडय़ाच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या तुरुंगात बंद आहेत. ईशा गुप्ता त्याच वेडय़ाच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. तिला समजते की, कोणी तरी अशोक-कुमारच्या विरोधात कट रचत आहे म्हणून ती अशोक-कुमारला वेडय़ांच्या हॉस्पिटलमधून सोडून देते. फिल्ममध्ये तमन्ना भाटिया एका टीव्ही चॅनेलची होस्ट बनली आहे. तिच ईशा गुप्ता आणि बिपाशा बसू उद्योगपती अशोकच्या सेक्रेटरीची भूमिका केली आहे. जे फिल्ममधल्या काही गाण्यात आणि रोमॅन्टिक सिन्समध्ये दिसते. अभिनयाच्या बाबतीत बोललं तर रितेश देशमुख आपल्या विनोदांनी बाकी सगळ्या कलाकारांपेक्षा भारी आहे.