चेन कुली की मेन कुली
दिग्दर्शक : किट्टू सलूजा
संगीत : सलीम- सुलेमान
कलाकार : राहूल बोस, जॅन खान, राजेश खेरा, कपिल देव
दिग्दर्शक किट्टू सलूजा यांनी 'चेन कुली की मेन कुली' चित्रपटात तेरा वर्षीय करणचा अनाथालय ते भारतीय क्रिकेट संघातील प्रवेशापर्यतचा हृदयस्पर्शी प्रवास रेखाटला आहे. आई- वडिलांपासून पारखा झालेल्या करणची भारतीय क्रिकेट संघात प्रवेशाची व आई- वडिलांची माया मिळविण्याची तीव्र इच्छा असते. क्रिकेटचा ध्यास घेतलेल्या करणला अनाथालयात बॅटने मिळते. तिच्या सहाय्याने तो क्रिकेटचे धडे गिरवायला सुरूवात करतो. ती मॅजिक बॅट असल्याची त्याची धारणा असते. योगायोगाने त्याचा खेळ भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाच्या पाहण्यात येतो. करणच्या फलंदाजीने ते प्रभावित होतात व भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले होतात.
पाकच्या दौर्यावर सुरवातीचे दोन सामने गमावल्यानंतर करणला तिसर्या सामन्यात संधी मिळते. संधीचे सोने करत तो संघास पराभवाच्या खाईतून बाहेर काढून विजयश्रीकडे नेतो. करणचा द्वेष करणारा राघव त्याची मॅजिक बॅट तोडतो. याणुळे आत्मविश्वास डळमळीत झालेल्या करणला प्रशिक्षक, 'जादू बॅटमध्ये नसून तुझ्या प्रतिभेत' असल्याचे पटवून देतात. करण आपल्या करिष्म्यावर संघास पाचव्या सामन्यातही विजय मिळवून देतो.
कथानकास क्रिकेटची पार्श्वभूमी दिल्याने चित्रपट मनोरंजक झाला आहे. दिग्दर्शकाने अनाथ मुलाच्या आयुष्यात आई -वडिलांचे महत्व कर्णधार वरूण याच्या माध्यमातून दाखविले आहे. चित्रपट मुलांसोबतच मोठ्यांसाठीही मनोरंजक ठरावा यासाठी दिग्दर्शकाने विशेष परिश्रम घेतल्याचे जाणवते. अनाथालयातील दृश्ये अप्रतिम झाली आहेत. बालकलाकारांकडून त्यांनी उत्तम अभिनय करून घेतला आहे.
गाणी निराशाजनक आहेत. सलीम- सुलेमान यांच्या संगीतात दम नाही. राहूल बोसने सशक्त अभिनय केला आहे. जॅन खानने करणची भूमिका दमदारपणे केली. राजेश खेरा यांचे हिटलरचे पात्रही भन्नाट. कपिल देव यांची पाहूण्या कलाकाराची भूमिका आहे. आपल्याकडे मुलांसाठी अगदी बोटावर मोजण्याजोगे चित्रपट येतात. त्यामुळे सारेगामा-एचएमव्ही बॅनरचा मुलांसाठी निखळ मनोरंजनात्क चित्रपट बनविण्याचा प्रयत्न निश्चित धाडसी व स्तुत्य आहे. एकंदरीत चित्रपट मुलांसोबत एकदा पाहण्यासाठी छान आहे.