डॅडी कूल- तद्दन फालतू
बॅनर : मारुति इंटरनेशनल
निर्माता : अशोक ठाकरिया, इंद्र कुमार
दिग्दर्शक : के मुरली मोहन राव
संगीतः राघव सच्चर
कलाकार : सुनील शेट्टी, आरती छाब्रिया, आशीष चौधरी, ट्यूलिप जोशी, आफताब शिवदासानी, जावेद जाफरी, किम शर्मा, सोफिया चौधरी, राजपाल यादव, चंकी पांडे, सुहासिनी मुळे, प्रेम चोपड़ा, वृजेश हीरजी, शरद सक्सेना
निर्माता इंद्र कुमार आणि अशोक ठाकरिया यांनी सव्वा कोटी खर्च करून 'डेथ एट ए फ्यूनरल' नावाच्या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क खरेदी केले. पण नक्कल करायची अक्कल नसेल तर काय होते, ते त्यांनी 'डॅडी कूल' हा चित्रपट करून दाखवून दिले आहे. एका चांगल्या कथेत हशे वसुल करण्याची शक्यता असतानाही, त्यांनी तिचा पार कचरा करून टाकलाय. फडतूस पटकथा, तितकेच फडतूस दिग्दर्शन आणि त्याहून फडतूस अभिनय या सगळ्यांनी चित्रपटाला तोच दर्जा प्राप्त करून दिला आहे.
स्टीवन (सुनील शेट्टी) मोठा लेखक बनू पहातोय. त्याच्या वडिलांचा मृत्यू झालाय. वडिलांना इतमामात निरोप द्यायचा त्याचा मानस आहे. त्यासाठी शानदार शवपेटी बनवायला टाकतो. कारागिर त्याच्याकडे पेटी पाठवून देतो, पण भलत्याचेच शव भरून. मग ट्रॅजेडीची कॉमेडी होऊन जाते.
या अंत्यसंस्काराला अनेक जण जमतात. त्या प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे. स्विवनचा लहान भाऊ ब्रायन (आशीष चौधरी) फार काही कमवत नाही. आपली आई आपल्याजवळ राहू नये असे त्याला वाटते. कारण तिला आणि तिच्या कुत्र्यांना पोसण्याइतका पैसा आपल्याकडे नाही, असे त्याचे म्हणणे आहे. स्टिवनची बायको नॅसी (आरती छाब्रिया) आपली सासू (सुहासिनी मुळ्ये) हिच्याबरोबर राहू इच्छित नाही. शिवाय सासूरवाडीची प्रॉपर्टी पिंटो (विजय पाटकर) या एजंटच्या सहाय्याने ती विकू पहातेय. मायकल (आफताब शिवदासानी) मारियावर (ट्युलिप जोशी) मरतोय. पण होणार्या सासर्यांना भेटायला घाबरतोय. जिम हाही (वृजेश हिरजी) मारीयावर मरतोय. या प्रसंगी तोही तिच्यावर इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करतोय.
जेनी (किम शर्मा) हिला आपला पती कार्लोसचे (जावेद जाफरी) हॉट मॉडेल आयशाशी (सोफी चौधरी) अफेयर आहे, असा संशय आहे. ब्लॅकमेलर एंड्रयूकडे (राजपाल यादव) मृत लेजारसची (शरत सक्सेना) काही गुपिते आहेत. त्याद्वारे तो पैसा कमवू पहातोय.
आफताब शिवदासानीची भूमिका तर ओंगळवाणी आहे. प्रेम चोपडा आणि जावेद जाफरीचा टॉयलेट सीनही तितकाच घाणेरडा आहे. ट्युलिप जोशी आणि वृजेश हिरजी यांचे प्रसंगही याच कॅटेगिरीत मोडणारे आहेत. सुनील शेट्टी याही चित्रपटात अभिनय करत नाही. जावेद जाफरी आणि चंकी पांडे यांनी हसविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. के. मुरली मोहन राव यांचे दिग्दर्शन तद्दन फालतू आहे. एकुणात हा चित्रपट फालतू आहे.