1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
  4. दिलवाले का ठरला कमजोर: 5 कारण

दिलवाले का ठरला कमजोर: 5 कारण

दिलवाले असा चित्रपट ठरला ज्यात निर्मात्याला तर लाभ झाला पण वितरकांना तोटा. तसेच शाहरुखच्या स्टारडमनुरूप बॉक्स ऑफिसवर 'दिलवाले' अपेक्षाकृत अयशस्वी ठरला. पाहू या मागील मुख्य 5 कारण:

शाहरुखचे वक्तव्य
शाहरुख खानने असहिष्णुतेवर दिलेल्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये नाराजी होती ज्यामुळे मोठ्या प्रमाणात दर्शकांनी या चित्रपटाचा बॉयकॉट केला आणि अनेक लोकांना तर 'दिलवाले'ची समीक्षा बघूनच चित्रपट न पाहण्याचा निर्णय घेतला. शाहरुखच्या चित्रपटाला अनेक शहरांमध्ये विरोध पत्कारावा लागला ज्याचा परिणाम ओपनिंगवर झाला. पहिला आठवडा महत्त्वाचा असतो आणि 'दिलवाले' ने येथेच मात खालली.

थकलेली कथा
केवळ शाहरुखच्या वक्तव्यावर चित्रपट कमजोर पडल्याची जबाबदारी टाकता येणार नाही. चित्रपट कमजोरच होता. थकलेली, रटाळ कहाणीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात मनोरंजन म्हणून काही नवीन नव्हतं. प्रेक्षकांना काही नवीन कहाणी हवी असते. कारण सलमान सारखा हिरोदेखील फॉर्म्युला सिनेमेसोडून 'बजरंगी भाईजान' सारखे सिनेमे करत आहे. शाहरूखकडून अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही.


शाहरुखची भूमिका
शाहरुखची भूमिका अतिशय लचर होती. प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी सिनेमागृहात आले होते पण शाहरूख दुसर्‍या कलाकारांना महत्त्व देत होता. शाहरूखचे रोमांस आणि अॅक्शन सीन्स कमी असल्यामुळे प्रेक्षक निराश झाले.


बाजीराव मस्तानी
असा अंदाज होता की 'दिलवाले'च्या समोर 'बाजीराव मस्तानी' टिकणार नाही, पण बाजी पलटली आणि याचा दंड 'दिलवाले'ला भोगावा लागला. पहिल्या आठवड्यातच हे लक्षात आले की 'दिलवाले'च्या अपेक्षा 'बाजीराव मस्तानी' अधिक दर्जेदार आहे, प्रेक्षकांची प्राथमिकता बदलली आणि कलेक्शनवर याचा परिणाम स्पष्ट दिसून आला.

 

रोहितचा रटाळ फॉर्म्युला
रोहित शेट्टी आणि शाहरुख खानने हिट चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस' दिल्यानंतर रोहीतला वाटले की काही नवीन नसलं तरी शाहरूख-काजोलच्या जोडीमुळे चित्रपट हिट होईल. म्हणून 'दिलवाले' मध्ये रोहितने तेच रटाळ जोक्स आणि उडणार्‍या कार दाखवल्या ज्याने प्रेक्षक कंटाळून चुकले होते. रोहितच्या कमजोर दिग्दर्शनामुळे मोठे कलाकारही चित्रपटाला स्ट्रॉंग बनवण्यात अयशस्वी ठरले.