देवल पितापुत्रांचा जोरदार पंचः अपने
दिग्दर्शक : अनिल शर्मा
संगीत : हिमेश रेशमिया
कलाकार : धमेंद्र, सनी देवल, बॉबी देवल, शिल्पा शेट्टी, कैतरिना कैफ
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'अपने' चित्रपटातून वडील व मुलांमधील भावनिक नात्यास अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. वडिल व मुलांमधील प्रेम, आपुलकी, अपेक्षांसोबतच कोणत्याही नात्यात अपरिहार्य असणारे ताण-तणाव बॉक्सिंग या खेळाच्या माध्यमातून पडद्यावर साकारले आहेत. देवल पितापुत्रांच्या यांच्या रूढ प्रतिमेस या चित्रपटाने छेद दिला आहे.
एकावेळी दहा पंधरा जणांना लीलया मारणारे धर्मेंद्र आणि सनी हे पितापुत्र या चित्रटात तसे काही करताना दिसत नाही, ही समाधानाची बाब. इथेही मारामारी आहेच, पण ती बॉक्सिंग रिंगमधील. बलदेव सिंह चौधरी (धर्मेंद्र) प्रख्यात मुष्टियोद्धा असतो. अमेरिकेतील लढतीदरम्यान कारस्थान रचून त्याला ड्रग्ज देण्यात येते.
आरोप सिद्ध झाल्याने त्याच्यावर पंधरा वर्षाची बंदी घालण्यात येते. आपल्यावरचा हा डाग मुलाच्या माध्यमातून पुसून टाकण्याचे ठरवतो. त्यासाठी मुलगा अंगदला (सनी देवल) बॉक्सर बनवतो. पण या खेळात पैसा फार मिळत नाही. परिणामी कूटुंबाची आर्थिक स्थिती ढासळते. हे पाहून अंगद खेळ सोडून व्यावसायिक बनतो.
व्यवसायातील यशाने कुटूंब आर्थिक सुस्थितीत येते. परंतु, अंगदच्या खेळ सोडून व्यवसाय करण्याच्या निर्णयाने बलदेव दुखावतो त्याच्या आयुष्यातील उद्दिष्टच नाहिसे झाल्यासारखे होते. व़डील व मुलांच्या नात्यात दुरावा येतो. लहान मुलगा करणचा (बॉबी देवल) एक हात निकामी असतो. दैवयोगाने तो बरा होतो आणि तो वडलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन घेतो. अमेरिकेत तो बॉक्सिंगच्या जागतिक स्पर्धेत उतरतो.
अंतिम सामन्यात त्याची लढत प्रसिद्ध बॉक्सर लूका ग्रेशिया याच्याशी होते. दोघांमध्ये जोरदार द्वंद होते. जिंकण्याच्या मार्गावर असलेला करण लुकाने केलेल्या कारस्थानामुळे हरतो. अशावेळी भाऊ सनीला रिंगच्या बाहेर राहून कसे चालेल. सहाजिकच तो रिंगमध्ये येतो आणि मग पुढे कथा सांगायची काही जरूरच नाही.
दिग्दर्शक अनिल शर्मांनी बलदेवचे खेळावरील प्रेम, त्याचे मानसिक द्वंद अप्रतिमपणे रेखाटले आहे. उत्तेजक द्रव्याच्या आरोपामुळे व्यथित झालेला आणि हा डाग पुसून टाकण्यासाठी तेच आयुष्याचे उद्दिष्ट ठेवणारा बलदेव धर्मे्द्रने दमदार उभा केला आहे. बलदेव व अंगद यांच्यातील संघर्षाची दृश्येही छान घेतली आहेत. दिग्दर्शकाची कथा सांगण्याची शैली प्रभावशाली आहे. संपूर्ण कथानक खोट्या आरोपामुळे दुखावलेल्या खेळाडूच्या दृष्टीकोणातून मांडले आहे.
मूष्टियुद्धाच्या दृश्यांवरची मेहनत जाणवते. करण व लूका यांच्यातील मुष्टियुद्धाचे दृश्य अंगावर शहारे आणतात. चित्रपटातील पंजाबमधील वातावरणाने मन आनंदी होते. परदेशात चित्रीकरणाचे पेव फुटलेले असताना देशातील मातीचा सुगंध निश्चितच आनंद देते. चित्रपटाचे आणखी संकलन करून अर्ध्या तासाने लांबी केल्यास चांगला होईल. संपूर्ण चित्रपट बलदेवच्या मुख्य व्यक्तिरेखेभोवती फिरतो.
धर्मेंद्रला खूप दिवसांनी सशक्त भूमिका मिळाली आहे. धर्मेंद्रने आपल्या अभिनयाने बलदेवचे पात्र दमदारपणे उभे केले आहे. सनी बॉक्सिंग करताना स्थूल वाटतो. बॉबी खराखूरा बॉक्सर वाटला. शिल्पा शेट्टी व कैतरिना कैफ यांना अभिनयाचे कष्ट घेण्याची फारशी गरज पडली नाही. किरण खेर व दिव्या दत्ता ठाकठीक. हिमेश रेशमियाचे संगीत ठीक 'तेरे आने से पहले.. ' हे एकमात्र हीट गाणे आहे. पार्श्वसंगीत दर्जेदार असल्याने मुष्टियुद्धाची दृश्ये जिवंत झाली आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक बाजू भक्कम आहेत.
समय ताम्रकर.....