पार्टनरः फुल्ल टू धमाल
निर्माता: सोहेल खान
दिग्दर्शक: डेविड धवन
संगीतकार: साजिद-वाजिद
कलाकार: सलमान खान, लारा दत्ता, कॅटरीना कैफ, गोविंदा, राजपाल यादव
डेव्हिड धवन यांचा चित्रपट पाहण्यापूर्वी काय? का? कुठे? आणि कशाला? असे अनेक प्रश्न डोक्यात निर्माण होतात. पण डोके बाजूला ठेवले तर आपण या चित्रपटाचा आनंद पुरेपुर घेऊ शकतो. अर्थात हे सार्यांनाच शक्य नाही. पण तरीही टाईमपास म्हणून, डोक्याला ताप म्हणून एखादा चित्रपट पहायचा असेल तर डेव्हिड धवनला पर्याय नाही.
'पार्टनर'च्या निमित्ताने बर्याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार्या धवन यांनी नेहमीच्या थाटतील 'विनोदी चित्रपट' आणला आहे. प्रेक्षकांना हसत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, हे समजून घेऊन चित्रपट तयार केला आहे. त्यामुळे या चित्रपटात दोन तास वीस मिनिटे मस्ती आणि धमाल आहे. प्रेक्षकांना हसवायला लावणारे अनेक प्रसंग यात आहेत. अट एकच कुठलेही प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. थोडक्यात डोके घरी ठेवून 'पिच्चर' एंजॉय करायचा. विशेष म्हणजे विनोदी करताना धवन यांनी द्वयर्थी संवादांचा आधार घेतलला नाही. त्यामुळे थो़डक्यात फॅमिलीबरोबरही तुम्ही तो पाहू शकता.
कथेत फार नाविन्य नाही. लव्ह गुरू असलेला प्रेम (सलमान खान) लोकांना पोरगी पटविण्याचे फंडे लोकांना देत असतो. एक दिवस भास्कर (गोविंदा) त्याच्याकडे जातो. तीस हजार रूपयाची नोकरी असलेला भास्कर करोडपती प्रियावर (कैतरीना कैफ) प्रेम करत असतो. प्रेम त्याला समजावून सांगतो की, प्रियाला जिंकणे अशक्य आहे पण भास्कर त्याचे ऐकत नाही. याच दरम्यान प्रेम नैनाशी (लारा दत्ता) नैन जुळविण्याचे प्रयत्न करत असतो. पण त्याचे सर्व फंडे नैनासमोर अयशस्वी ठरतात. मग प्रेम आणि भास्कर आपापल्या प्रेयसींना जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार होतात. त्याचीच ही कहाणी पडद्यावर पहाणे मनोरंजक ठरेल.
घासून गुळगुळीत झालेल्या (हा शब्दही त्याच प्रकारातला) कथेवर धवन यांनी चित्रपट काढलाय. सहाजिकच याचे बलस्थान संवाद आहेत. यातही मध्यंतरापूर्वीचा भाग मनोरंजक आहे. त्यानंतर मात्र पाट्या टाकल्या आहेत. त्यामुळे उगाचच चित्रपट लांबल्यासारखा वाटतो. क्लायमॅक्स मात्र चांगला घेतला आहे.
चित्रपट पहावासा वाटतो, ते त्यातील संवादामुळे. संजय छैल यांनी लिहिलेले संवाद चुरचुरीत, मिश्किल आहेत. अनेक दृश्य तर संवादाच्या जोरावर भाव खाऊन गेली आहेत. काही दृश्यांत तर गोविंदा आणि सलमान यांच्यावरही संवाद आहेत.
विनोदी भूमिका करताना अनेकदा सलमान इनोदी दिसतो. पण इथे तो बर्यापैकी वावरला आहे. विनोदवीर गोविंदासमोर सलमान चांगलाच टिकाव धरतो. गोविंदासाठी डेव्हिड धवनने सारे रान मोकळे ठेवले आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेत तो छानच बागडलाय. पण त्याचे शारिरीक वजन वाढल्याने काही प्रसंगात तो कैतरिना कैफचा चक्क काका वाटतो.
सलमान आणि गोविंदाची जुगलबंदी चित्रपटाचे आकर्षण आहे. छोटा डॉन झालेला राजपाल यादव ठीकठाक. कैतरिना आणि लारा दत्ता यांना सुंदर दिसण्याव्यतिरिक्त काहीही काम नाही. बाल कलाकार अली हाजीचे काम चांगले आहे.
साजिद वाजिद यांचे संगीत लोकप्रिय असले तरी ते का लोकप्रिय आहे, हे काही उलगडत नाही.
एकूण काय तर डेव्हिड धवन छाप चित्रपटांचे चाहते असणार्यांना पार्टनर नक्की आवडेल. आणि ज्यांना आपला ताणतणाव कमी करायचा असेल, त्यांनी हा चित्रपट नक्की पहावा.
दिग्दर्शक: डेविड धवन
संगीतकार: साजिद-वाजिद
कलाकार: सलमान खान, लारा दत्ता, कॅटरीना कैफ, गोविंदा, राजपाल यादव
|