फारच कंटाळवाणे आहे ‘गेम’
IFM |
संगीत : शंकर-अहसान-लॉय
कलाकार- अभिषेक बच्चन, कंगना राणावत, अनुपम खेर, शहाना गोस्वामी, सारा जेन डियास
दिग्दर्शक - अभिनय देव
या आठवड्यात अभिषेक बच्चनाचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गेम’रिलीज झाला आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन एका नाइट क्लबच्या मालकाची भूमिकेत आहे, जो ड्रग्सची खरेदी-विक्री करतो.
तसेच, बोमन इराणी बँकॉकमध्ये राहतो, जिमी शेरगिल मुंबईत अभिनेताम्हणून काम करतो व शहाना गोस्वामी लंडनमध्ये दारूच्या नशेत राहणारी एक पत्रकार आहे.
हे चौघेही एक दुसऱ्यांसाठी अनोळखी असून अनुपम खेरच्या म्हणण्यावर एका ग्रीक आयलंडवर पोहचतात, तेथे अनुपम खेर सांगतो की तुम्हा चौघांचा संबंध त्याच्या मुलीच्या खुनाशी आहे व त्याच्या जवळ या गोष्टीचे साक्षीदार आहे. अनुपम खेरने म्हटलेले खरं सिद्ध होण्याअगोदरच त्याची हत्या करण्यात येते.
चित्रपटात कंगना राणावत क्राईम ब्रांच ऑफिसर झाली आहे, जी हत्येच्या जागेवर पोहचून या चौघांना घरी जाण्यास सांगते, पण ती त्यांच्यावर नजर ठेवून असते आणि जागे जागेवर केमॅरा लावून ठेवते ज्याने हे सिद्ध होईल की हत्या कोणी केली आहे.
