1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By वेबदुनिया|

फालतू दर्जाची 'टीम'

फालतू दर्जाची टीम सिनेगप्पा
निर्माता : मनोज चतुर्वेदी, संजय चतुर्वेदी
दिग्दर्शक : अजय चंडो
संगीत : डब्बू मलि
कलाकार : सोहेल खान, अमृता अरोरा, आरती छाब्रिया, यश टोंक, व्रजेश हीरजी, सयाजी शिंदे, कुलभूषण खरबंदा
रेटिंग : 0.5/5

IFM
'टीम- द फोर्स' हा दुय्यम कलावंतांचा तिय्यम दर्जाचा चित्रपट आहे. दिग्दर्शकही त्याच दर्जाचा असल्याने त्यांच्याकडून फारशी अपेक्षा ठेवता येत नाही. आणि हीच तेवढी अपेक्षा दिग्दर्शक आणि कलावंतांनी पूर्ण केली आहे.

कथा अशी आहे. तीन मित्रांना व्हिडीओ अल्बम बनवायचा आहे. त्यांच्याकडे खायला-प्यायलाही काही नाही. त्यांचा दयाळू घरमालक त्यांना व्हिडीओ अल्बम बनविण्यासाठी पैसे देतो. मग ते गोव्याला जाता. त्याचवेळी एक गुंड घरमालकाला खंडणीसाठी धमकी देतो. मग हे तिघेही युवक त्या गुंडाला धडा शिकवतात. ही कथा लिहिण्यासाठी फार डोके चालवायची गरज नाही.

चित्रपटाचा हिरो आहे, सोहेल खान. त्याच्या नावावर स्वबळावर चाललेला एकही चित्रपट नाही. त्याने या चित्रपटात जे काही माकडचाळे केले आहेत, त्याने प्रचंड त्रास होतो. तीच कथा व्रजेश हिरजी, यश टोंक आणि सयाजी शिंदे यांची. त्यातल्या त्यात सयाजीने काही प्रसंग बरे केलेत. पण बाकी सगळा आनंद आहे.

चित्रपटाची कथा टाकाऊ आहे. अभिनय 'फ' दर्जाचा आहे. संपादनाच्या नावे बोंब आहे. डब्बू मलिकचे संगीतही डब्यात घालण्याच्या लायकीचे आहे. थोडक्यात, दिग्दर्शक अजय चंडोकने तद्दन फालतू चित्रपट प्रेक्षकांच्या माथी मारला आहे.