1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By वेबदुनिया|

लफंगे परिंदे : धमाल टाईमपास

लफंगे परिंदे धमाल टाईमपास
बॅनर : यशराज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोपड़
दिग्दर्शक : प्रदीप सरका
संगीत : आर. आनं
कलाकार : नील नितिन मुकेश, दीपिका पादुको
यू/ए सर्टिफिकेट * 12 रील * 2 घंटे 5 मिनट


लफंगे परिंदे हा मुंबईतील गल्ल्यांतील रहाणार्‍या तरुणांची कथा आहे. दीपिका पदुकोण व निल नितिन मुकेश यांची यात महत्वाची भूमिका आहे.

निल अर्थात चित्रपटातील नंदू याला वन शॉट नंदू म्हटले जाते. त्याला फायटिंग करण्‍याचा भारी नाद असतो. त्याची खासीयत म्हणजे तो डोळ्यांवर पट्टी बांधून लढत असतो. भरपूर मार खाल्ल्यानंतर तो शेवटच्या एकाच बुक्क्यात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत असतो.

दुसरीकडे पिंकी पालकर अर्थात दीपिकाला स्केटींग करण्‍याचा भयंकर छंद असतो. डोळ्यांनी दिसत नसतानाही ती स्केट करताना नाचत असते.

पिंकीचे डोळे नंदूच्या कारची धडग लागल्यावरच गेलेले असतात. ही गोष्ट फक्त नंदूलाच माहिती असते.

पिंकीचे स्वप्न पूर्ण करण्‍यासाठी मग नंदू धडपड करतो, एकेदिवशी नंदूचे गुपित उघडे पडते, त्याच्याच गाडीच्या अपघाताने आपले डोळे गेल्याचे पिंकीला माहिती होते, मग पिंकी त्याच्यावर नाराज होते, दोघे पुन्हा एक होतात. असे या चित्रपटातील सार आहे.

मुळात एका लव्ह स्टोरीत फायटिंग घुसवण्‍यात आली आहे, मुंबईच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्‍यासाठी यात बरंच काही मुंबईकरण करण्‍यात आले आहे. चित्रपटातील काही भूमिकांना गुलकंद, चड्डी, डीझेल अशी नावंही देण्‍यात आली आहे.

या चित्रपटात निल मुकेश व दीपिकाचा अभिनय मार खाल्ला आहे. त्यांना याचे आणखी धडे घेण्‍याची गरज असल्याचे यातून दिसून येते.