वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई
IFM
निर्माता : एकता कपूर, शोभा कपूर
दिग्दर्शक : मिलन लुथरिया
संगीत : प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : अजय देवगन, कंगना, इमरान हाशमी, प्राची देसाई, रणदीप हुड़ा, गौहर खान
सेंसर सर्टिफिकेट : यू/ए * 2 घंटे 24 मिनट
रेटिंग : 3.5/5
हा चित्रपट कोणत्याही एका व्यक्तीरेखेवर आधारीत नसल्याचे बोलले जात असले तरी, चित्रपट पाहिल्यावर मात्र यावर विश्वास बसत नाही. या चित्रपटातील व्यक्तीरेखा या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम व हाजी मस्तान यांच्याशी साधर्म्य असलेल्या आहेत.
हाजी मस्तान म्हणजेच यातील सुल्तान मिर्झा (अजय देवगन) सामंजस्याने व्यवसाय (स्मगलिंग) करण्यावर जोर देत असतो. आपली तत्वे तो पाळण्यावर भर देत असतो.
दुसरीकडे दाऊदच्या भूमिकेत शोएब म्हणजेच इमरान हाश्मी आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण कसे श्रीमंत होवू यावर त्याचा भर असतो. तो सुल्तान सारखाच होण्यासाठी त्याच्या गँगमध्ये सहभागी होतो.
काही दिवस सुल्तान त्याला आपली जबाबदारी स्वीकारण्यास सांगातात, व इथेच सारे बदलते. शोएब मुंबईत गँगवार, दंगल असे घडवतो. यामुळेच या दोघांमध्ये वाद निर्माण होतो.
चित्रपटाची कथा इतकी छान लिहिली गेली आहे, की चित्रपटात पुढे काय होणार याची माहिती असली तरी प्रेक्षक पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय खूर्ची सोडत नाही.
