1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा

वेलकमला जोरदार प्रतिसाद

वेलकमला जोरदार प्रतिसाद
PRPR
तमाम प्रेक्षकांना ज्याची उत्सूकता होती, तो दिवस अखेर आला. ओम शांती ओम आणि सावरीया यांची जोरदार टक्कर झाल्यानंतर शु्क्रवारी वेलकम व तारे जमींपर या दोन बड्या चित्रपटांची टक्कर झाली. एकीकडे मसाला आणि कलावंतांची मांदियाळी असणारा वेलकम तर दुसरीकडे अमिर खानच्या दिग्दर्शनाखालील पहिलाच चित्रपट.

या लढतीत कोणत्या चित्रपटाला लोक पसंती देतील याविषयी उत्सूकता होती. शिवाय इदची सुट्टी असल्याने गर्दी होणार हे उघड होते.

PRPR
त्यानुसार वेलकमला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. ओम शांती ओमसारखी गर्दी या चित्रपटाला झाली. अक्षय कुमारने आपणही गर्दी खेचू शकतो हे दाखवून दिले आहे. मल्टिप्लेक्स व एकपडदा चित्रपटगृहांमध्ये वेलकमला जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यातुलनेत अमिरच्या तारे जमीं पर ला मल्टिप्लेक्स व शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. पण छोट्या शहरांमध्ये तितकी गर्दी झाली नाही. पण दोघांनाही सुरवात चांगली मिळाली हे नक्की.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा