Festival Posters

मैत्री दिनावर निबंध (Essay on Friendship Day)..

Updated: शुक्रवार, 31 जुलै 2020 (19:28 IST)
 
आज फ्रेंडशिप डे संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो, कारण असा एखादाच कोणी माणूस असेल ज्याला मित्र नाही, आणि ज्याला मैत्रीचे महत्त्व ही माहीत नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यात कमी किंवा अधिक प्रमाणात मित्र असतात, मित्रांसमवेत घालवलेला वेळ कोणास आवडणार नाही. विशेषतः बालपणातील मैत्री खूप घट्ट असते. ज्याची आठवण कायमची मनात राहते.
 
मैत्री एक असं नातं आहे ज्याला एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार निवडतो. बालपणात नकळत बरीच लोकं मित्र बनून जातात. ज्यामध्ये काही मित्र असेही असतात जे शाळेपासून ते कॉलेजपर्यंत साथ देतात तर काही चांगल्या आणि वाईट काळात देखील आपली मैत्री निभावतात. तथापि असे मित्र फारच कमी असतात जे आयुष्यभर आपली मैत्री जपतात. म्हणून मैत्री करताना आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी.
 
मित्र असे असतात ज्यांचा सहवास आपल्या भविष्यावर प्रभाव टाकतं. वाईट सवय असलेल्या मित्रांचा सहवास आपल्याला आणि आपल्या भविष्याला खराब करण्याची क्षमता राखतो, तर चांगली विचारसरणी आणि चांगल्या सवयी असलेले मित्र आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि आपल्या जीवनाला सुशोभित करण्यास मदत करतात.
 
आजकाल मित्रांना अनेक वर्गात विभागले आहेत जसं की एक सारखा छंद जोपासणारे मित्र, व्यवसायी मित्र, कामाच्या ठिकाणचे मित्र, कामा पूर्तीचे मित्र इत्यादी पण जे खरे मित्र असतात त्यांची आवड निवड एक सारखी असते. ते आपल्याला आयुष्याचा पदोपदी साथ देतात ते नेहमीच आपल्या चांगल्याचा विचार करतात.
 
म्हणून, जर आपल्या आयुष्यात देखील असा कोणी खरामित्र असला, तर मैत्री दिनाच्या या खास प्रसंगी आपल्या त्या खास मित्राला तो खास असल्याची जाणीव नक्कीच करून द्या. या दिवसाला आपल्या जिवलग मित्रांसह साजरा केले जातो. बरेच लोकं आपल्या मित्रांसह साजरा करण्यासाठी विविध योजना आखून हा दिवस साजरा करतात. संपूर्ण दिवस जरी नाही तरी जेवढे शक्य असल्यास आपल्या व्यस्ततेमधून काही क्षण आपल्या मित्रांसाठी नक्की काढावे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Parenting Tips: मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे प्रश्न कधीच विचारू नका

पंचतंत्र : घोडा आणि गाढव, धोबी

Perimenopause vs Menopause पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये काय फरक असतो?

घरात भाज्या नसतील तेव्हा बनवा १० मिनिटांत झटपट राजस्थानी दही-पापडची भाजी

First Impression पहिल्या भेटीतच लोक तुम्हाला पसंत करु लागतील, स्वत:मध्ये फक्त हे बदल करा

पुढील लेख