1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
  4. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर उद्धव-राज ठाकरे एकत्र

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर उद्धव-राज ठाकरे एकत्र

shivsena
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सोमवारी दुसरा स्मृतिदिन झाला. राज्यातील हजारो शिवसैनिकांसह अनेक नेत्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दुपारी भेट झाली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधु एकत्र येण्याचे संकेत मिळाले आहेत.
 
राज ठाकरे दुपारी दीड वाजता शिवाजी पार्कवर दाखल झाले. त्यांना बाळासाहेबांना  श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी राज यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
 
स्मृतिस्थळी सकाळपासूनच उपस्थित असलेले उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघे एकमेंकाच्या शेजारी बसले होते व राज यांनी उद्धव यांच्या खांदयावर हात ठेवला होता. ठाकरे बंधुंमध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. यावेळी सर्वांचीच देहबोली प्रचंड सकारात्मक होती व कोणताही दुरावा जाणवत नव्हता. यावरून ठाकरे बंधु पुन्हा एकत्र येतील, असे संकेत दोन्ही पक्षातून मिळत आहेत. 
 
राज आणि उद्धव यांच्यात पक्षातील दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु असल्याची चर्चा आहे. भाजपने सेनेला सत्तेत घेतले नसल्याने मुंबई, ठाणे महापालिकेत शिवसेना व मनसे एकत्र येतील व भाजपला सत्तेपासून दूर करतील, असे बोलले जात आहे. 
About Writer
wd