होळीचे रंग (चित्रपटवाल्यांसाठी रंगपंचमी) चित्रपटांमध्येही उधळले गेले आहेत. फागून नावाचे दोन चित्रपट बनले आहेत. 'होली आयी रे' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'होली' या नावाचाही एक चित्रपट आला होता.
होळीचा संबंध इतर बाबींशी जोडून चित्रपट काढण्यात आले. 'फागून' या चित्रपटात धमेंद्र आणि वहिदा रहेमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याचे कथानक होळी या विषयाशीच संबंधीत आहे. यात होळीच्या दिवशी रंग टाकताना नायिका पतीला त्याच्या बेकारीविषयी सुनावते. नायक गुपचूप घर सोडून निघून जातो आणि पूर्णपणे अनोळखी जीवन व्यतीत करतो. पोटाला चिमटे घेऊन तो बायकोसाठी साड्या घेत असतो. पण होळी त्याच्या जीवनात नैराश्य आणते. कुठून तरी आलेली ठिणगी त्याच्या साड्यांची होळी करते. नायक त्या आगीतून कशीबशी एक साडी वाचवतो. होळीच्या दिवशी तो पत्नीला भेटतो आणि ही साडी तिला देतो. 'पिया संग खेलो होली, फागुन आयो रे' हे या चित्रपटातील गीत लोकप्रिय ठरले होते.
राजकुमार संतोषी यांच्या 'दामिनी' या चित्रपटात होळीच्या ठिकाणी तरूण एका तरूणीच्या आयुष्याची 'होळी' करतात हे दाखविले आहे. तारूण्याच्या माजात हे तरूण आपल्याच घरातील मोलकरणीवर बलात्कार करतात. त्यांच्याविरूध्द त्याच घरची सून धैर्याने लढा देते. या चित्रपटात हा सण आणि या सणाच्या निमित्ताने त्याचा होणारा बेरंग फार छान दाखविला आहे.
चित्रपटांमधील होळीवर आधारीत गीते....
'मदर इंडिया' चित्रपटातील 'होली आई रे'... 'फागुन' मधील 'पिया संग खेलो होरी व फागुन आयो रे' 'कटी पतंग' चित्रपटातील 'आज न छोड़ेंगे'... 'जख्मी' चित्रपटातील 'आई-आई रे होली'.... 'नवरंग' चित्रपटातील 'आया होली का त्योहार'... 'कोहिनूर' चित्रपटातील 'तन रंग लो ली आज मन रंग ल?.... 'आपकी कसम' चित्रपटातील 'जय-जय शिवशंकर'... 'आखिर क्यों' चित्रपटातील 'सात रंग में खेल रही है'.... 'शोले' चित्रपटातील 'होली के दिन दिल खिल जाते हैं'... 'सिलसिला' चित्रपटातील 'रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे...