1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (14:07 IST)

David Warner: टायटॅनिक' फेम अभिनेता डेव्हिड वॉर्नरने वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

photo- social mediaब्रिटिश कॅरेक्टर अॅक्टर डेव्हिड वॉर्नर यांचे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. वॉर्नरने अनेक मोठ्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. टायटॅनिक आणि ओमेन सारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही त्यांची आठवण नेहमी ठेवू. त्याच्या शेवटच्या दिवसांत ते नॉर्थवुडच्या डॅनविले हॉलमध्ये राहत होते 
 
वॉर्नरचा जन्म 1941 साली मँचेस्टर येथे झाला . 1997 मध्ये रिलीज झालेल्या जेम्स कॅमेरॉनच्या टायटॅनिक चित्रपटात ते स्पायसर लव्हजॉयच्या भूमिकेत दिसले होते . 1976 च्या हॉरर क्लासिक 'द ओमेन' मधील छायाचित्रकार कीथ जेनिंग्जच्या भूमिकेसाठीही ते ओळखले  जातात.
 
वॉर्नर त्याच्या खलनायकी भूमिकांसाठी खूप प्रसिद्ध होते. त्यांनी 'ट्रॉन' (1982), 'लिटिल माल्कम' (1974), 'टाईम बॅंडिट्स' (1981), 'द फ्रेंच लेफ्टनंट वुमन' (1981), 'द मॅन विथ' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय 2018 साली आलेल्या मेरी पॉपिन्सच्या सिक्वेलमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मोठ्या पडद्याशिवाय वॉर्नरने टीव्हीच्या दुनियेतही बरेच काम केले होते. 'पेनी ड्रेडफुल,' 'रिपर स्ट्रीट,' 'स्टार ट्रेक,' 'डॉक्टर हू' हे त्यांचे काही प्रमुख टीव्हीशो होते.