सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2024 (11:15 IST)

Rapper Chris King Passed Away:प्रसिद्ध रॅपर ख्रिस किंगचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन

कॅलिफोर्नियाचा प्रसिद्ध रॅपर ख्रिस किंगचे याच्या 32 व्या वर्षी निधन झाले. ख्रिस किंगच्या मृत्यूने संगीत क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सर्वप्रथम, रॅपर ख्रिस किंगच्या जिवलग मित्राने एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना कळवले की ख्रिस किंग आता आमच्यासोबत नाही.

त्यांच्या मृत्यूमुळे चाहते आणि सेलिब्रिटी दुखी झाले.त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. टेनेसीच्या नॅशविलेमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळाला नाही. जस्टिन बीबर ने देखील आपल्या रॅपर मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे. ख्रिसच्या निधनाची बातमी ऐकून चाहते दुखी झाले आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी या साठी प्रार्थना करून श्रद्धांजली वाहत आहे. 
 
Edited By - Priya Dixit