सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Updated : सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (11:07 IST)

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. मात्र वागणुकीमुळे भारतीयांच्या मनातून उतरली आहे. मुंबईतील लाईव्ह परफॉर्मन्सनंतर केटी रात्री मायदेशी परतली. यावेळी  गर्दीतून वाट काढत केटी एअरपोर्टवर आत जाण्यासाठी निघाली असता सिक्युरिटीने तिला पासपोर्ट मागितला. पण केटीने सिक्युरिटी पर्सनकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आणि ती पुढे निघाली. तिच्या मागोमाग येणा-या तिच्या मॅनेजरकडे सिक्युरिटी पर्सनने पासपोर्ट दाखवण्याची विनंती केली. पण तिचा मॅनेजरही पासपोर्ट न दाखवता पुढे गेला. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली. 
 
सध्या या व्हिडीओवरून केटीला ट्रोल केले जात आहे.अनेक युजर्सनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. केटीचे हे वागणे युजर्सला अजिबात आवडले नाही. एखाद्या भारतीय सेलिब्रिटीने केटीच्या देशात असे केले असते तर चालले असते का? असा संतप्त सवाल अनेकांनी केला.