आउटलँडर : एक्शन चित्रपट
|
'अंडरवर्ल्ड : राइझ ऑफ द लिकान्स' सारखाच हा चित्रपट आहे. 'आउटलँडर' साठी खासकरून चित्रित करण्यात आलेले 580 व्हिज्युअल इफेक्ट्स प्रेक्षकांना आकर्षित करणार आहेत.
मानवी चेहरा असणारा कैनान हा परग्रहवासी आहे. त्याच्या अवकाश यानाला अपघात होतो आणि यान कोसळते. कान हा स्थानिक लढवय्या त्याला आपल्या ताब्यात घेतो. कैनान त्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतो. पृथ्वीवर आपण एकटेच आलो नसल्याचे सांगून कैनान त्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याच्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही.
|
या चित्रपटातील लोकेशन्स पाहण्यासारखी आहेत. कॅनडाच्या उत्तरेकडील न्यूफाउंडलॅड आणि नोवा स्कॉटियामध्ये शूटिंग करण्यात आले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत डब करून प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदीमध्ये हा 'कुरुक्षेत्र' या नावाने प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात जीम केवीजेल, रॉन पर्लमॅन, जॉन हर्ट, सोफिया माइल्स यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.
