Oscar Nominated Hollywood Movies 2012 | ऑस्करसाठी नामांकित चित्रपट
85व्या अॅकॅडमी अॅवॉर्डस म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांची घोषरा 24 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठीची नामांकने घोषित झालेली आहेत आणि या सर्वच चित्रपटांमध्ये तीव्र चुरस आहे. उत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन झालेल्या या चित्रपटांची माहिती....
'गॉन बेबी गॉन' आणि 'द टाऊन' यासारखे उत्तम चित्रपट बनवणार्या दिग्दर्शक बेन एफलेक यांनी 'आर्गो' बनवला आहे. 1979मध्ये इराणच्या तेहरान येथील अमेरिकन दूतावासावर अतिरेक्यांनी हल्ला करून 52 अमेरिकन लोकांना ओलिस ठेवले होते. त्यांच्या तावडीतून सहाजण पळून जाण्यात यशस्वी ठरले व त्यांनी कॅनडाच्या दूतावासात आश्रय घेतला. या सहाजणांनी इराणमधून पळून जाण्याची योजना आखली. ही योजना त्यांनी कशी अमलात आणली याचे चित्रण या चित्रपटात आहे.
ऑस्करसाठी नामांकने : सात (बेस्ट चित्रपट, बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर, बेस्ट अॅडाप्टेड सक्रीनप्ले, फिल्म एडिटिंग, बेस्ट साऊंड एडिटिंग, साऊंड मिक्सिंग, बेस्ट ओरिजनल स्कोअर).
आर्गो

PR |
झिरो डार्क थर्टी
अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक चित्रपट याविषयावर बनले. कॅथरिन बिगेलोचा 'झिरो डार्क थर्टी' हा चित्रपट हल्ल्यानंतर लादेनची स्थिती काय झाली हे दर्शवणारा आहे. सीआयए एजंट असलेली माया अल्-कायदाचा म्होरक्या असलेल्या लादेनला कोणत्याही परिस्थितीत शोधण्याचा विडा उचलते. पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये त्याचा छडा लागताच दोन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या घरावर हल्ला केला जातो. त्या रात्री काय काय घडले याचे चित्रट यात आहे. मायाच्या भूमिकेत जेसिका चॅस्टियन हीन तगडा अभिनय केला आहे.दिग्दर्शक : कॅथरिन बिगेलो. ऑस्करसाठी नामांक : पाच (बेस्ट पिक्चर, बेस्ट अॅक्ट्रेस, बेस्ट रायटिंग-ओरिनिनल स्क्रीन प्ले, बेस्ट साऊंड एडिटिंग, बेस्ट फिल्म एडिटिंग).