Last Modified: शुक्रवार, 15 एप्रिल 2011 (16:29 IST)
... और लूट गईं शकीरा
PR
मेक्सिकोत पॉपस्टार शकीरा जेथे आपल्या गीतांनी लोकांचे मन घायाळ करत आहे तेथेच तिच्या या कार्यक्रमात असा एक लुच्चा उपस्थित होता ज्याने शकीराशी हात मिळवण्याच्या हेतूने तिच्या जवळ जाऊन तिच्या बोटातील अंगठीवर हात मारला.
दिलकश कोलंबियाई गायिका शकीरा आपल्या चाहत्यांना भेटत होती तेव्हा ही घटना घडली. या घटनेशी संबंद्धित व्हिडिओला यूट्यूबवर दाखवण्यात आले आहे. चोर इतका चालाख होता की त्याने शकीरा बरोबर तिच्या अंगरक्षकांच्याही डोळ्यात धूळ टाकली.
शकीराला चोरी झाली हे कळल्यानंतर देखील ती आपल्या चाहत्यांसाठी त्याच जोषात कार्यक्रम देत होती. (भाषा)