जस्टिनच्या प्रेमात पडली जेनिफर!
हॉलिवूडची मशहूर अदाकारा जेनिफर एनिस्टन सद्या अभिनेता जस्टीन थेरॉक्सच्या प्रेमात अडकली आहे. पीपुल मॅगझिन ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, 42 वर्षीय अभिनेत्रीला नुकतेच थेरॉक्ससोबत पाहण्यात आले. ‘फ्रेंड’पासून चर्चेत आलेल्या जेनिफरने ब्रॅड पिटशी लग्न केले असून विंसे वॉन आणि जॉन मेयरशी झालेले प्रेम प्रसंग सर्वांनाच माहीत आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार जेनिफर सद्या थेरॉक्सच्या प्रेमात पडली आहे. या दोघांना लोकांनी एका पार्टीत सोबत बघितले आहे. (भाषा)