1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

नाओमी साकारणार प्रिन्सेस डायना

PR
मोठ्या पडद्यावर ब्रिटनची दिवंगत राजकुमारी डायनाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री नाओमी वाट्स सज्ज झाली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी नाओमीचे वास्तव्य सध्या लंडनला आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या नाओमीचे पालनपोषण ऑस्ट्रेलियामध्ये झाले आहे. नाओमी ओलिवर हिर्सचबिगेलच्या आगामी 'कॉट इन फ्लाईट' या चित्रपटात डायनाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. 'कॉट इन फ्लाईट' या सिनेमाची कथा 1997मध्ये कार अपघातात मृत पावणार्‍या राजकुमारी डायनाच्या जीवनातील अंतिम दोन वर्षांवर आधारित आहे.

एका वेबसाइच्या अहवालानुसार, डायनाची भूमिका साकारण्याचे दडपण नाओमीवर आल्याचे खूद्द नाओमीनेच कबूल केले
आहे.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा