ख्यातनाम अमेरिकन गायिका व्हिटने हाऊसस्टनचे वयाच्या 48व्या वर्षी निधन झाले. व्हिटने हाऊस्टनच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. हाऊस्टन मागच्या वर्षीच्या मे महिन्यात ड्रग्ज आणि मद्यपानाच्या आहारी गेल्याने त्यावरील उपचारासाठी पुनर्वसन केंद्रात दाखल झाली होती. तिच्या सुरक्षारक्षकाने सर्वप्रथम तिला मृतावस्थेत पाहिले. त्यानंतर पोलिसांना त्याने सूचना दिली. लॉसएंजिल्स शहरात होणार्या 54 ग्रॅमी सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच तिचा मृत्यू चाहत्यांना चटका लावून गेला.
आजवर सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी गायिका म्हणून व्हिटने हाऊस्टनचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा